अकोला: लातूरचे जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांची अकोला मुख्यालय असलेल्या महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) व्यवस्थापकीय संचालकपदी (एमडी) नियुक्ती करण्यात येत असल्याचा आदेश शासनामार्फत ८ डिसेंबर रोजी देण्यात आला. त्यानुसार ‘महाबीज’चे नवे ‘एमडी’ म्हणून जी.श्रीकांत लवकरच अकोल्यात रुजू होणार आहेत.महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल भंडारी यांची दहा दिवसांपूर्वी बदली करण्यात आली. त्यामुळे शासनाच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या रिक्त असलेल्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा अतिरिक्त प्रभार अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे देण्यात आला. त्यानुसार ७ डिसेंबर रोजी व्यवस्थापकीय संचालक पदाचा अतिरिक्त प्रभार जिल्हाधिकाऱ्यांनी स्वीकारल्यानंतर लातूरचे जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांची अकोला येथे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली करण्यात येत असल्याचा आदेश शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने ८ डिसेंबर रोजी दिला.
जी.श्रीकांत महाबीजचे नवे ‘एमडी’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 18:31 IST
Mahabeej News जी.श्रीकांत लवकरच अकोल्यात रुजू होणार आहेत.
जी.श्रीकांत महाबीजचे नवे ‘एमडी’!
ठळक मुद्देअनिल भंडारी यांची दहा दिवसांपूर्वी बदली करण्यात आली. रिक्त पदाचा प्रभार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे देण्यात आला.जी.श्रीकांत यांची महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून बदलीचा आदेश ८ डिसेंबर रोजी देण्यात आला.