शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

संपूर्ण लॉकडाऊनचा पहिल्याच रविवारी फज्जा; बाजारपेठ बंद; रस्त्यांवर मात्र वर्दळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 10:21 IST

रविवार, २ आॅगस्ट रोजी संपूर्ण शहरातील बाजारपेठ लॉकडाऊन होती; मात्र संचारबंदीचा कुठेही लवलेश दिसून आला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत १ आॅगस्टपासून बाजारपेठेतील सम-विषम नियम रद्द करत सर्व दुकाने सोमवार ते शनिवारपर्यंत खुली ठेवण्यास मुभा देण्यात आली असून, दर रविवारी संपूर्ण लॉकडॉऊन पाळण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. त्यानुसार रविवार, २ आॅगस्ट रोजी संपूर्ण शहरातील बाजारपेठ लॉकडाऊन होती; मात्र संचारबंदीचा कुठेही लवलेश दिसून आला नाही. पादचाऱ्यांसह दुचाकीस्वारांची वर्दळ शहरातील सर्वच रस्त्यांवर दिवसभर दिसून आली.गत महिन्यापासून लागू असलेला सम-विषम पद्धतीने दुकाने खुली ठेवण्याचा निर्णय रद्द करण्याबाबत व्यापाºयांचा आग्रह होता त्यानुसार रविवार वगळता सोमवार ते शनिवार सर्वच दुकाने खुली ठेवण्याच्या निर्णय घेण्यात आल्याने व्यापाºयांना दिलासा मिळाला आहे. व्यापाºयांनीही नियमांचे पालन करत रविवारी संपूर्ण लॉकडाऊन पाळले. विशेष म्हणजे, यापूर्वीच्या लॉकडाऊनमधील सुरू असणारे किराणा दुकाने, भाजीपाला विक्रीसुद्धा रविवारी बंद होती. व्यापाºयांनी लॉकडाऊनला संपूर्ण प्रतिसाद दिला. शहरातील कोणत्याही भागात कोणतेही दुकान उघडे नव्हते. नागरिकांकडून मात्र लॉकडाऊनला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. या लॉकडाऊन दरम्यान नागरिकांना घराबाहेरही पडता येणार नाही. असे निर्देश असतानाही शहरातील सर्वच रस्त्यांवर विनाकारण फिरणाºयांची मोठी वर्दळ पाहावयास मिळाली. यापूर्वी पुकारण्यात आलेल्या तीन दिवसाच्या लॉकडाऊन काळात शहरातील रस्त्यांवर पाहावयास मिळालेला शुकशुकाट रविवारच्या लॉकडाऊनमध्ये कुठेही दिसून आला नाही. दुचाकीवरून फेरफटका मारणाºयांना कोणत्याही भागात अटकाव झाला नाही. त्यामुळे दिवसभर सर्वच रस्त्यांवर नागरिकांची मोठी वर्दळ होती. अनेक ठिकाणी पोलिसांचे पथक तैनात होते मात्र कुणालाही अटकाव करण्यात आला नाही.दरम्यान सोमवारी रक्षाबंधन असल्याने रविवारी राखी विक्री मोठया प्रमाणात होते. रविवारीच लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे राखी विक्रेत्यांना मोठा फटका बसला. त्यामुळे या विक्रेत्यांनी नाराजी व्यक्त केली.

‘वंचित’ने जिल्हाधिकारी निवासासमोर थाटले राखी विक्रीचे दुकानवंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाºयांनी रविवारी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या निवासस्थानासमोर राखी विक्रीचे दुकान थाटून जिल्हा प्रशासनाने लावलेला लॉकडाउन अमान्य केला.व्यापारी, छोटे व्यावसायिक यांना महापालिका व पोलीस दुकाने बंद करायला भाग पाडत असल्याचे तसेच दंड ठोठावत असल्याचे समजताच वंचितच्या पदाधिकाºयांनी जयहिंद चौकात काही दुकानांना दुकाने उघडण्याची विनंती केली.त्यानुसार काही दुकानदारांनी राखी विक्रीची दुकाने सुरु केली. त्यानंतर वंचित पदाधिकाºयांनी जिल्हाधिकाºयांनी लावलेल्या लॉकडाऊनचा विरोध करीत थेट जिल्हाधिकारी यांच्या निवास स्थानासमोरच राखी विक्रीचे दुकान थाटून अभिनव आंदोलन केले.

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक