शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
4
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
5
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
6
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
7
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
8
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
9
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
10
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
11
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
12
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
13
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
14
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
15
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
16
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
17
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
18
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
19
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
20
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?

अकोल्याच्या भावी डॉक्टरवर अमरावतीत काळाचा घाला

By admin | Updated: September 13, 2014 01:20 IST

दुचाकीच्या अपघातात दोघे ठार

अकोला : अमरावती शहरातील पंचवटी मार्गावरील पॉवर हाऊसजवळ गुरुवारी रात्री ११.३0 वाज ताच्या सुमारास भरधाव बोलेरोने धडक दिल्याने दोन भावी डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाला. यापैकी एक युवक अकोल्यातील रहिवासी आहे. अमरावती शहरातील डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या तृतीय वर्षाला शिकणारे शिशिर विलास सोनोने (२२ रा. उमरी अकोला) आणि त्याचा मित्र अनुराग राधेश्याम चो पकर (२३) हे गुरुवारी रात्री ११.३0 वाजताच्या सुमारास मोटारसायकलवर मोर्शी रोडवरील एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी जात असताना ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात विरुद्ध दिशेने येणार्‍या भरधाव बोलेरोने त्यांच्या मोटारसायकलला जबर धडक दिली. यामध्ये दुचाकीचा चुराडा होऊन शिशिर व अनुराग यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी बोलेरोचालक ओमप्रकाश कुटुमल कुकरेजा (३६) याला अटक केली. शिशिर सोनोने हा अकोल्यातील सर्जन डॉ. विलास सोनोने यांचा एककुलता एक मुलगा आहे. शिशिर हा अमरावती ये थे शिकायला होता. शुक्रवारी दुपारी शिशिरचे पार्थिव अकोल्यात आणण्यात आले. सायंकाळी उमरी मोक्षधाम येथे शोकाकुल वातावरणात शिशिरच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ** दुसर्‍या अपघात अकोल्यातील आणखी एकजण ठार, एक गंभीर

दुसरा अपघात अमरावती जिल्हय़ातील लोणीजवळ घडला. अकोला येथून लग्न सोहळ्याहून परतत असताना लोणीजवळ शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास ट्रकने कारला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. त्यापैकी सुरेश कोकले हे अकोल्यातील मलकापूर भागात राहणारे असल्याचे समजते. त्यांच्यासोबत असलेली एक महिला गंभीर जखमी असून, तिला नागपूर येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. मृतकांमध्ये ज्ञानदेवराव तायडे यांच्यासह सुरेश बापूराव कोकले (४५रा. मलकापूर) यांचा समावेश आहे तर पौर्णिमा सुरेश कोकले (४५), लीलाबाई बापूराव कोकले (७0) व शशीकला ज्ञानदेव तायडे (६२) गंभीर जखमी झाले. कोकले कुटुंब हे अकोल्यातील मलकापूर भागातील रहिवासी आहे; परंतु ते बाहेरठिकाणी स्थायिक झाले आहेत. कोकले कुटुंबातील लग्नसभारंभ असल्याने हे कुटुंब अकोल्यात आले होते.