शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

आदर्श क्रेडिट सोसायटीचे खाते गोठविल्याने गुंतवणूकदारांचे कोट्यवधी अडकले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 11:11 IST

विदर्भातील अकोला, परतवाडा, अमरावती, वर्धा, भंडारा, नागपूर, कोंढाळी, रामटेक, चंद्रपूर येथील गुंतवणूकदार यामध्ये अडकले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: चौदा हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोपामुळे प्रकाशझोतात आलेल्या आदर्श क्रेडिट को-आॅपरेटिव्ह सोसायटीचे संपूर्ण खाते गोठविल्या गेल्याने विदर्भातील हजारो गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत. यामध्ये अकोल्याचादेखील समावेश असून, स्थानिक टिळक मार्गावरील कार्यालयास कुलूप लागून आहे. अकोल्यातील लघू व्यापारी आणि खातेदारांचे एक कोटी रुपये असल्याचे बोलले जात आहे.अहमदाबाद येथे मुख्य कार्यालय असलेल्या आदर्श क्रेडिट को-आॅपरेटिव्ह सोसायटीमध्ये १४ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप झाल्याने त्याची चौकशी सुरू झाली. दरम्यान, रिझर्व्ह बँकेने आदर्श सोसायटीचे संपूर्ण खाते गोठविले आहे.सोबतच सोसायटीच्या जबाबदार संचालकांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू झाली आहे. याचा फटका विदर्भातील गुंतवणूकदारांनादेखील बसला असून, त्यांचे कोट्यवधी रुपये वादात सापडले आहे. विदर्भातील अकोला, परतवाडा, अमरावती, वर्धा, भंडारा, नागपूर, कोंढाळी, रामटेक, चंद्रपूर येथील गुंतवणूकदार यामध्ये अडकले आहे.विदर्भाला जवळपास ५० कोटी रुपये यामध्ये अडकल्याचा प्राथमिक अंदाज आहे. उपरोक्त शाखांमधील खाते गोठविल्या गेल्याने संपूर्ण उलाढाल बंद पडली आहे. त्यामुळे गुंतवणूकदार त्रासले आहे. अडकलेली रक्कम गुंतवणूकदारांना आता कधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.आॅनलाइन करंट अकाउंटचे व्यवहार या सोसायटीत मोठ्या प्रमाणात होत असल्याने लघू व्यापारी आणि उद्योजकांची मोठी रक्कम आदर्शमध्ये होती. ही आता धोक्यात सापडली आहे.

टॅग्स :Akolaअकोलाbankबँक