शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

अकोलेकरांना मिळणार मोफत वायफाय सुविधा

By admin | Updated: October 16, 2015 02:13 IST

नऊ सिग्नलच्या ठिकाणी यंत्रणा; ५00 मीटर परिसरात कनेक्टिव्हिटी.

आशिष गावंडे /अकोला : महापालिका कार्यालयासह चारही झोन कार्यालये व काही शासकीय कार्यालयांना १५ वर्षांपर्यंत फोर-जी इंटरनेटची मोफत सुविधा देण्यासोबतच, आता सामान्य अकोलेकरांना सार्वजनिक ठिकाणी मोफत वायफाय सुविधा देण्यावरही रिलायन्स कंपनीने शिक्कामोर्तब केले आहे. शहरात नऊ ठिकाणी उभारल्या जाणार्‍या सिग्नल यंत्रणेच्या माध्यमातून ५00 मीटरच्या परिसरात वायफायची कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. शहरात फोर-जी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रिलायन्स कंपनीने मनपा प्रशासनासोबत करार केला. मध्यंतरी ५८ किलोमीटर अंतराचे खोदकाम झाल्यानंतर उर्वरित खोदकामासाठी कंपनीने हात आखडता घेतला होता. आयुक्त अजय लहाने यांनी महापालिकेची धुरा सांभाळल्यानंतर कंपनीने नवीन खोदकामाची परवानगी मागितली. आयुक्तांनी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर कंपनीला उर्वरित १७ किलोमीटरच्या खोदकामाची परवानगी देण्यात आली. फोर-जीची सुविधा अतिशय गतिमान असून, कंपनीच्यावतीने मनपा कार्यालयासह चारही झोन कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालय, तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाला पंधरा वर्षांपर्यंत मोफत इंटरनेट सुविधा दिली जाणार आहे. त्यामुळे मनपासह इतर शासकीय कार्यालयांमध्येही मोफत वायफाय सेवा उपलब्ध होईल. महत्वाचे म्हणजे, शहरात विविध ठिकाणच्या नऊ सिग्नल यंत्रणांच्या माध्यमातून अकोलेकरांनादेखील मोफत वायफाय सुविधा देण्याचा निर्णय रिलायन्स कंपनीने घेतला आहे. त्यानुषंगाने सिग्नलच्या ठिकाणी प्रत्येकी दोन डक्ट टाकण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याची माहिती आहे. यातील एका ह्यडक्टह्णच्या माध्यमातून सिग्नल यंत्रणा सुरू केली जाईल, तर दुसर्‍या डक्टद्वारे वायफाय सेवा सुरू होईल. पश्‍चिम महाराष्ट्रातील इस्लामपूर शहरानंतर सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना मोफत वायफाय सुविधा देणारी ही राज्यात दुसर्‍या क्रमांकाची महापालिका ठरेल.