शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

वाळू घाटांच्या लिलावाचा मार्ग मोकळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 13:04 IST

अकोला: राज्यस्तरीय पर्यावरण आघात मूल्यांकन प्राधिकरणमार्फत राज्यातील वाळू घाटांच्या लिलावासाठी प्रस्तावांना पर्यावरणविषयक मान्यता देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याने राज्यातील वाळू घाटांचा लिलाव करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

- संतोष येलकरअकोला: राज्यस्तरीय पर्यावरण आघात मूल्यांकन प्राधिकरणमार्फत राज्यातील वाळू घाटांच्या लिलावासाठी प्रस्तावांना पर्यावरणविषयक मान्यता देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याने राज्यातील वाळू घाटांचा लिलाव करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.राष्ट्रीय हरित लवादाच्या ११ डिसेंबर २०१८ रोजीच्या आदेशानुसार वाळू घाटांसंदर्भात पर्यावरण विभागाने गत १५ जानेवारी २०१६ रोजी काढलेली अधिसूचना निलंबित करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील जिल्हास्तरीय पर्यावरण समित्या बरखास्त करण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्यातील सर्वच जिल्ह्यांत वाळू घाटांचा लिलाव करण्याची प्रक्रिया रखडली होती. वाळू घाटांचे लिलाव अद्याप करण्यात आले नसल्याने, राज्यातील सर्वच जिल्ह्यांत वाळू टंचाईची परिस्थिती निर्माण झाली. दरम्यान, वाळू घाटांच्या लिलावांसाठी पर्यावरण मान्यतेसाठी वाळू घाटांचे प्रस्ताव राज्य पर्यावरण समितीकडे सादर करण्याचा आदेश शासनामार्फत राज्यातील सर्व जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांना देण्यात आला होता. त्यानुसार वाळू घाटांचे प्रस्ताव जिल्हा खनिकर्म अधिकारी कार्यालयांमार्फत राज्य पर्यावरण समितीकडे सादर करण्यात आले. राज्य पर्यावरण समितीच्या शिफारशीनुसार राज्यातील जिल्हानिहाय वाळू घाटांच्या लिलावासाठी पर्यावरणविषयक परवानगी देण्याची प्रक्रिया राज्यस्तरीय पर्यावरण आघात मूल्यांकन प्राधिकरणमार्फत गत ११ फेबु्रवारीपासून सुरू करण्यात आली. त्यामुळे राज्यात रखडलेल्या वाळू घाटांचा लिलाव करण्याची प्रक्रिया मार्गी लागणार आहे.रखडलेली बांधकामे लागणार मार्गी!वाळू घाटांच्या लिलावाची प्रक्रिया रखडल्याने, वाळू टंचाईच्या स्थितीत राज्यातील विविध जिल्ह्यांत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलांची कामे, सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत विविध बांधकामे, पाटबंधारे विभागांतर्गत सिंचन अनुशेष योजनेंतर्गत सिंचन प्रकल्पांची कामे व खासगी बांधकामे रखडली होती. वाळू घाटांच्या लिलावासाठी पर्यावरणविषयक परवानगी देण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने, आता वाळूअभावी रखडलेली बांधकामे मार्गी लागणार आहेत.

 

टॅग्स :Akolaअकोलाsandवाळू