शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

होमक्वारंटाइन बाधित रुग्णांचा मुक्तसंचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:19 IST

मूर्तिजापूर : कोरोनाबाधित रुग्णांना पॉझिटिव्ह अहवालानंतर हेंडज येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पाच दिवस क्वारंटाइन राहिल्यानंतर त्यांना पुढील दहा दिवस ...

मूर्तिजापूर : कोरोनाबाधित रुग्णांना पॉझिटिव्ह अहवालानंतर हेंडज येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पाच दिवस क्वारंटाइन राहिल्यानंतर त्यांना पुढील दहा दिवस होमक्वारंटाइन राहण्यास सांगितले जाते, परंतु असे रुग्ण शहरात व ग्रामीण भागात बिनधास्त फिरताना आढळून आले आहे. अशा रुग्णांमुळे अधिक प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मूर्तिजापूर शहरात नागरी व व्यापाऱ्यांसाठी सतत कोरोना चाचणी शिबिर आयोजित करण्यात येत आहे. तसे नागरिकांना आवाहनही करण्यात आले आहे. त्या आवाहनाला नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद पण मिळत आहे. अशावेळी अनेक जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, अशा बाधितांना नंतर हेंडज येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पाच दिवसांसाठी क्वारंटाइन करून त्यांच्यावर उपचारदेखील करण्यात येतात, उपचारानंतर रुग्णांना सक्तीने होमक्वारंटाइन राहण्यास सांगितले जाते. परंतु आपण ठणठणीत असल्याच्या अविर्भावात होमक्वारंटाइनच्या सक्तीला न जुमानता शहरात व ग्रामीण भागात मुक्तसंचार करताना आढळून येत असल्याने हा चिंतेचा विषय ठरला आहे. अशा रुग्णांमुळे तालुक्यात कोरोनाचा अधिक फैलाव होत असल्याचे बोलल्या जात आहे. या संदर्भात प्रशासनाने सक्ती कडक करण्याची मागणी होत आहे. सर्वत्र जमाव बंदी लागू करण्यात आली असता नागरिकांचे घोळके व दुकानात गर्दी होत असल्याचे चित्र आहे तर ग्रामीण भागात टवाळ गोष्टी करण्यासाठी एकत्र जमताना दिसतात अशा परिस्थितीला आळा घालून कोरोना नियंत्रणात आणता येत असताना प्रशासनाने या गोष्टीला गांभीर्याने घेण्याची गरज आहे.

होमक्वारंटाइन असलेल्या रुग्णांच्या घरोघरी जाऊन चेकिंग करण्यासाठी सात टिम तयार केल्या आहेत. होमक्वारंटाइन असलेले रुग्ण बाहेर फिरताना आढळल्यास नागरिकांनी ही आमच्या निदर्शनास आणून द्यावी. दोषी व्यक्तीवर निश्चितच गुन्हा दाखल करण्यात येईल.

अभयसिंह मोहिते

उपविभागीय अधिकारी, मूर्तिजापूर