शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला-वाशिमच्या दुष्काळग्रस्त भागातील ७६४९ विद्यार्थ्यांना मिळतेय मोफत बससेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 13:11 IST

अकोला : अकोला-वाशिम जिल्ह्याच्या दुष्काळग्रस्त भागातील ७६४९ विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षासाठी मोफत बससेवा दिली जात आहे. ही आकडेवारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अकोला विभागाने दिली असून, शैक्षणिक वर्षाच्या अखेरपर्यंतही आकडेवारी कमी-जास्त होत आहे.

अकोला : अकोला-वाशिम जिल्ह्याच्या दुष्काळग्रस्त भागातील ७६४९ विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षासाठी मोफत बससेवा दिली जात आहे. ही आकडेवारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अकोला विभागाने दिली असून, शैक्षणिक वर्षाच्या अखेरपर्यंतही आकडेवारी कमी-जास्त होत आहे.पुरेसा पाऊस न पडल्याने राज्यातील अनेक तालुक्यांत दुष्काळी स्थिती निर्माण झाली. वेगवेगळ्या मदतीसोबतच राज्याच्या परिवहन महामंडळाने दुष्काळग्रस्त तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा करण्याची घोषणा केली. अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील अनेक तालुके दुष्काळग्रस्त जाहीर झाल्यानंतर अकोला एसटी विभागाने ही सेवा सुरू केली. अकोला-वाशिम जिल्ह्यातील अकोला आगार क्र. १- १८३६, अकोला आगार क्रं. २- १७५०, अकोट आगार ३०३, कारंजा- ८०, मंगरूळपीर- ३७, वाशिम- २८६, रिसोड- १०६३, तेल्हारा- १३८५, मूर्तिजापूर- ९०९ विद्यार्थ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून ही सेवा दिली जात आहे. अकोला आगार क्रमांक एकमधून सर्वात जास्त विद्यार्थी लाभ घेत असून, वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर येथील सर्वात कमी म्हणजे केवळ ३७ विद्यार्थी लाभ घेत आहेत. दहावी, बारावी सोबतच आयटीआय, महाविद्यालयीन आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी या योजनेचा लाभ घेत आहे. दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना बोनाफाइड प्रमाणपत्र आणल्यानंतर फ्री पासेसची सेवा अकोला एसटी मंडळाने दिली.- अकोला-वाशिममधील दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची संख्या या महिन्यात ७६४९ दिसत असली, तरी ती संख्या दर महिन्यात बदलत राहते. अनेक परीक्षांचा कालावधी संपुष्टात येत आहे तर काही नवीन विद्यार्थी दाखल होत आहेत. त्याचा परिणाम विद्यार्थी संख्येच्या आकडेवारीवर होत असतो.-चेतना खिरवाडकर, विभागीय नियंत्रक, एसटी विभाग अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाstate transportराज्य परीवहन महामंडळ