शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रक्तपेढ्यांमध्ये लागणार नि:शुल्क रक्त पुरवठ्याचे फलक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 11:29 IST

राज्यातील सर्वच रक्तपेढ्यांनी दर्शनी भागात मोफत रक्त पुरवठ्याचे फलक लावावे, असे निर्देश राज्य रक्त संक्रमण परिषदेने एका परिपत्रकाद्वारे दिले आहेत.

ठळक मुद्देकेंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने या संदर्भात २०१४ मध्ये सूचना केली होती.राज्य रक्त संक्रमण आणि राज्य रक्त संक्रमण परिषदेने आदेश जारी करत १६ डिसेंबर रोजी परिपत्रक काढले आहे.क्तपेढ्यांना मोफत रक्तपुरवठा होत असल्याचे फलक दर्शनी भागात लावणे बंधनकारक करण्यात आले.

- प्रवीण खेते  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : थॅलेसिमिया, हिमोफेलिया तसेच सिकलसेल या सारख्या आजाराने ग्रस्त रुग्णांना नियमित रक्त संक्रमणाची गरज असते. या रुग्णांना नि:शुल्क रक्त व रक्त घटक मिळावे यासाठी राज्यातील सर्वच रक्तपेढ्यांनी दर्शनी भागात मोफत रक्त पुरवठ्याचे फलक लावावे, असे निर्देश राज्य रक्त संक्रमण परिषदेने एका परिपत्रकाद्वारे दिले आहेत. विशेष म्हणजे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने या संदर्भात २०१४ मध्ये सूचना केली होती.थॅलेसिमिया आसो वा सिकलसेल या सारख्या आजारांमध्ये रुग्णांना वारंवार रक्त संक्रमण करावे लागते. त्यासाठी रुग्णांना पैसेही मोजावे लागतात. ही बाब लक्षात घेता, केंत्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागातर्फे २०१४ एका सूचनेनुसार, प्रत्येक परवानाधारक रक्तपेढ्यांना थॅलेसिमिया, हिमोफिलिया, सिकलसेल व रक्ताशी निगडित इतर आजाराच्या रुग्णांना रक्त व रक्त घटकाचा नि:शुल्क पुरवठा करण्याचे निर्देशित करण्यात आले होते. राज्यात त्याची अंमलबजावणी १८ जून २०१४ पासून बंधनकारक करण्यात आली होती; परंतु त्यानंतरही याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे अनेक रुग्णांन पैशांअभावी रक्त मिळाले नाहीत. ही बाब लक्षात घेता राष्ट्रीय राज्य रक्त संक्रमण आणि राज्य रक्त संक्रमण परिषदेने आदेश जारी करत १६ डिसेंबर रोजी परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकानुसार राज्यातील सर्वच परवानाधारक रक्तपेढ्यांना मोफत रक्तपुरवठा होत असल्याचे फलक दर्शनी भागात लावणे बंधनकारक करण्यात आले.तर रक्तपेढीचा परवाना रद्द!जर अशा रुग्णांना मोफत रक्तपुरवठा न झाल्यास, त्यासाठी शुल्क आकारल्यास, बदली रक्तदात्याची मागणी केल्यास किंवा रक्तघटक देण्यास टाळाटाळ केल्यास त्या रक्तपेढीचे नाहरकत प्रमाणपत्र आणि परवाना रद्द करण्यात येईल.डॉ. हेडगेवार रक्तपेढीने स्वीकारले रक्तपालकत्वडॉ. हेडगेवार रक्तपेढीने २००३ म्हणजेच स्थापनेपासून थॅलेसिमिया रुग्णांचे रक्तपालकत्व स्वीकारले. त्या अंतर्गत ५५ रुग्णांची नोंद करण्यात आली असून, गत वर्षभरात ८४१ रक्तपिशवीचा नि:शुल्क पुरवठा करण्यात आला आहे.

राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या परिपत्रकानुसार, सिकलसेल, थॅलेसिमियासारख्या आजाराच्या रुग्णांना मोफत रक्त पुरवठा करणे गरजेचे आहे. शिवाय, रक्तपेढ्यांनी या संदर्भात फलक लावण्याचेही बंधनकारक करण्यात आले आहे.- डॉ. श्रीराम चोपडे, विभाग प्रमुख, शासकीय रक्तपेढी, अकोला

 

टॅग्स :AkolaअकोलाBlood Bankरक्तपेढी