शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बनावट दस्तऐवजाद्वारे बँकेला दीड कोटींचा गंडा; तीन वर्षांनंतर रोखपालास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 14:21 IST

अकोला - रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेणुका माता मल्टी स्टेट को-आॅपरेटिव्ह बँकेत २०१४ मध्ये कार्यरत असलेल्या शाखा व्यवस्थापक, रोखपाल व एका खातेदाराने बँकेची बनावट दस्तऐवजाद्वारे कर्ज काढून तब्बल दीड कोटी रुपयांनी फसवणूक केल्याची घटना घडली.

ठळक मुद्देरेणुका माता मल्टी स्टेट को-आॅपरेटिव्ह या बँकेत शाखा व्यवस्थापक म्हणून बीड जिल्ह्यातील सुग्रीव खेळकर हे कार्यरत होते, तर रोखपाल म्हणून परमेश्वर बाबूलाल गावडे कार्यरत होता. व्यवस्थापक व रोखपालाने खातेदार अशपाक हुसेन रा. नायगाव याला सोबत घेऊन काही बनावट दस्तऐवज तयार केले. बनावट दस्तऐवज संगनमताने तयार करून ते खरे असल्याचे भासवून बँक प्रशासनाला २०१४ मध्ये तब्बल दीड कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला.

अकोला - रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेणुका माता मल्टी स्टेट को-आॅपरेटिव्ह बँकेत २०१४ मध्ये कार्यरत असलेल्या शाखा व्यवस्थापक, रोखपाल व एका खातेदाराने बँकेची बनावट दस्तऐवजाद्वारे कर्ज काढून तब्बल दीड कोटी रुपयांनी फसवणूक केल्याची घटना घडली. या प्रकरणी तिघांविरुद्ध रामदास पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तब्बल तीन वर्षांनंतर या प्रकरणातील आरोपी रोखपाल परमेश्वर बाबूलाल गावडे याला अटक करण्यात आली आहे.रेणुका माता मल्टी स्टेट को-आॅपरेटिव्ह या बँकेची शाखा रामदास पेठ परिसरात आहे. २०१४ मध्ये या बँकेत शाखा व्यवस्थापक म्हणून बीड जिल्ह्यातील सुग्रीव खेळकर हे कार्यरत होते, तर रोखपाल म्हणून परमेश्वर बाबूलाल गावडे कार्यरत होता. व्यवस्थापक व रोखपालाने खातेदार अशपाक हुसेन रा. नायगाव याला सोबत घेऊन काही बनावट दस्तऐवज तयार केले. त्यानंतर या बनावट दस्तऐवजाद्वारे बँकेतून तब्बल दीड कोटी रुपयांची रक्कम काढली. बनावट दस्तऐवज संगनमताने तयार करून ते खरे असल्याचे भासवून बँक प्रशासनाला २०१४ मध्ये तब्बल दीड कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला. त्यांनतर रामदास पेठ पोलीस ठाण्यात बँक प्रशासनाने दिलेल्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तब्बल चार वर्षांनी या फसवणूक प्रकरणातील तीन आरोपींपैकी एक रोखपाल गावडे याला रामदास पेठ पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रामदास पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ करीत आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाbankबँकfraudधोकेबाजीRamdas Peth Police Stationरामदासपेठ पोलीस स्टेशन