शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीतील गाळ काढण्याच्या देयकात घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 12:55 IST

अकोला: शहरातील संभाव्य पाणीटंचाईवर उपाययोजना करताना विहिरीतून गाळ काढण्याच्या कामांचा समावेश होता. प्रभाग क्रमांक १२ मध्ये जलप्रदाय विभागाचे कनिष्ठ अभियंता नीरज ठाकूर यांनी तीन विहिरीतील गाळ काढण्याच्या मोबदल्यात अदा केल्या जाणाऱ्या देयकाच्या फाइलमध्ये घोळ केल्याची बाब खुद्द महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांच्या निदर्शनास आली आहे.

अकोला: शहरातील संभाव्य पाणीटंचाईवर उपाययोजना करताना विहिरीतून गाळ काढण्याच्या कामांचा समावेश होता. प्रभाग क्रमांक १२ मध्ये जलप्रदाय विभागाचे कनिष्ठ अभियंता नीरज ठाकूर यांनी तीन विहिरीतील गाळ काढण्याच्या मोबदल्यात अदा केल्या जाणाऱ्या देयकाच्या फाइलमध्ये घोळ केल्याची बाब खुद्द महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांच्या निदर्शनास आली आहे. याप्रकरणी नीरज ठाकूर यांच्याविरोधात फौजदारी तक्रार दाखल करण्याचा आदेश शुक्रवारी आयुक्त कापडणीस यांनी जारी केल्याने खादाड कर्मचाºयांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.मार्च २०१८ मध्ये महान धरणात अत्यल्प जलसाठा उपलब्ध असल्याचे पाहून शहरातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सत्ताधारी भाजपाने व प्रशासनाने समन्वय साधत १४ कोटींचा प्रस्ताव तयार केला होता. शासनाने या प्रस्तावाला कात्री लावत महत्त्वाच्या कामांचा समावेश करण्याचे निर्देश देत ३ कोटी २८ लाख रुपये निधी मंजूर केला होता. यामध्ये नवीन सबमर्सिबल पंप, हातपंप कार्यान्वित करणे, विहिरीतील गाळ काढून खोलीकरण करणे, नादुरुस्त सबमर्सिबल पंप दुरुस्तीचा समावेश होता. जलप्रदाय विभागामार्फत कंत्राटदारांनी सदर कामे केल्यानंतर या विभागातील कनिष्ठ अभियंत्यांनी प्रत्यक्ष कामाची पाहणी करून देयकांच्या फायली तयार केल्या. या कामांचे देयक प्राप्त व्हावे, या उद्देशातून सदर फायली मनपा आयुक्त संजय कापडणीस यांच्याकडे स्वाक्षरीसाठी सादर करण्यात आल्या. आयुक्त कापडणीस यांनी प्रभाग क्रमांक १२ मधील तीन विहिरींचा गाळ काढून खोलीकरण करण्याच्या फ ायली तपासल्या असता, संबंधित कनिष्ठ अभियंता नीरज ठाकूर यांनी मोजमापात घोळ केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता अभियंता नीरज ठाकूर यांच्याविरोधात फौजदारी तक्रार दाखल करण्याचा आदेश जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे यांना शुक्रवारी देण्यात आला.संगनमत केल्याचा संशयप्रभाग क्रमांक १२ मध्ये तीन विहिरींचा गाळ काढणे व खोलीकरणाचा समावेश होता. त्यासाठी प्रत्येकी एक लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. याप्रकरणी मनपा कर्मचाºयांना हाताशी धरून काही नगरसेवकांनी संगनमत केल्याचा दाट संशय प्रशासनाने व्यक्त केला आहे. 

मानधन तत्त्वावर कार्यरत कनिष्ठ अभियंता नीरज ठाकूर यांच्याविरोधात फौजदारी तक्रार दाखल करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार कारवाई केली जाईल.-सुरेश हुंगे,कार्यकारी अभियंता जलप्रदाय विभाग, मनपा.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका