शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अकोला मार्गे धावणाऱ्या हमसफर एक्स्प्रेसच्या चार फेऱ्या रद्द; नागरिकांच्या अडचणीत वाढ

By atul.jaiswal | Updated: November 30, 2023 13:31 IST

अतुल जयस्वाल,  अकोला : उत्तर रेल्वेच्या आग्रा विभागातील पलवल-मथुरा सेक्शनवरील मथुरा स्टेशनवर २७ नोव्हेंबर ते ६ फेब्रुवारी २०२४ या ...

अतुल जयस्वाल, अकोला: उत्तर रेल्वेच्या आग्रा विभागातील पलवल-मथुरा सेक्शनवरील मथुरा स्टेशनवर २७ नोव्हेंबर ते ६ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत अनेक गाड्या तात्पुरत्या रद्द, शॉर्ट-टर्मिनेशन, डायव्हर्ट केल्या जाणार आहेत. यामध्ये अकोला मार्गे धावणाऱ्या हमसफर एक्स्प्रेसच्या चार फेऱ्यांचाही समावेश असल्याने अकोलेकरांना अडचणीचा सामना करावा लागणार आहे.

दक्षिण मध्य रेल्वेकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, गाडी क्र. १२७५१ हुजूर साहिब नांदेड-जम्मू तावी हमसफर एक्स्प्रेस २६ जानेवारी २०२४ व २ फेब्रुवारी २०२४ रोजी रद्द करण्यात आली आहे. तर गाडी क्र. १२७५२ जम्मू तावी-हुजूर साहिब नांदेड हमसफर एक्स्प्रेस २८ जानेवारी २०२४ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रस्थान स्थानकावरून धावणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.

मुंबई ते नागपूर वन वे स्पेशल शनिवारी

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते नागपूर दरम्यान शनिवार, २ डिसेंबर रोजी एकमार्गी विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ०२१०३ मुंबई-नागपूर विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून शनिवार, २ डिसेंबर रोजी पहाटे ००.२० वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी १५.३२ वाजता पोहोचेल. ही गाडी अकोला स्थानकावर सकाळी १०:२७ वाजता येणार आहे. एकूण १७ डब्यांच्या या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, वर्धा या ठिकाणी थांबा असणार आहे.

टॅग्स :railwayरेल्वेAkolaअकोला