अकोला: चोरट्याने दरवाजाचे कुलूप तोडून घरातील ४ लाख २८ हजार ५00 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. ही घटना डाबकी रोडवरील सरस्वतीनगरात घडली. या प्रकरणी डाबकी रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. डाबकी रोडवरील सरस्वतीनगरात राहणारे विश्वास ओंकार मानकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते व त्यांचे जावई सुनील क्षीरसागर कुटुंबासह तिरूपती दर्शनासाठी गेले होते. त्यांची आई घरात एकटी असल्याने ती विश्वास मानकर यांच्याकडे गेली. घराला कुलूप असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घरातील दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि घरातील कपाटात ठेवलेली सोन्याची माळ, मंगळसूत्र, सहा मंगळसूत्र, कानातील सोन्याचे झुमके, सोन्याची चेन, गणपती, देवी व चांदीचे नाणी आदी दागिने लंपास केले. या दागिन्यांची किंमत ४ लाख २८ हजार ५00 रुपये आहे. या प्रकरणी डाबकी रोड पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंवि कलम ४५७, ३८0 नुसार गुन्हा दाखल केला.
सरस्वतीनगरात चार लाखांची घरफोडी
By admin | Updated: May 15, 2015 01:38 IST