शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

फोर-जी प्रकरणाला सुरुंग; कंत्राटी उपअभियंत्याची कंपनीसोबत ‘सेटिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 11:06 IST

देशातील नामवंत मोबाइल कंपन्यांनी सादर केलेल्या अपूर्ण दस्तऐवजाच्या पडताळणीसाठी बांधकाम विभागाकडून निव्वळ ‘टाइमपास’ केला जात आहे, हे येथे उल्लेखनीय.

अकोला: महापालिका प्रशासनाला कोट्यवधी रुपयांनी चुना लावणाऱ्या मोबाइल कंपन्यांवर ठोस कारवाईसाठी प्रशासनाने हालचाली सुरू करताच कंपन्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मनपा प्रशासनाचे मीठ खाणाºया बांधकाम विभागातील एका कंत्राटी उपअभियंत्याने आजपर्यंत प्रशासनाने कोणत्या हालचाली केल्या आणि पुढे कोणती कारवाई प्रस्तावित केली, याची इत्थंभूत खबरबात काही नामवंत कंपन्यांच्या स्थानिक व्यवस्थापकांकडे पोहोचविल्याची धक्कादायक माहिती आहे. हा प्रकार कमी म्हणून की काय, देशातील नामवंत मोबाइल कंपन्यांनी सादर केलेल्या अपूर्ण दस्तऐवजाच्या पडताळणीसाठी बांधकाम विभागाकडून निव्वळ ‘टाइमपास’ केला जात आहे, हे येथे उल्लेखनीय.राज्य शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान संचालनालय, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परवानगीचा दावा करणाºया देशातील नामवंत मोबाइल कंपनीसह इतर मोबाइल कंपन्यांनी महापालिका प्रशासनाची दिशाभूल आणि कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केल्याचे प्रकरण उजेडात आले आहे. शासनाच्या महानेट प्रकल्प अंतर्गत फोर-जी सुविधेसाठी फायबर आॅप्टिक केबलचे जाळे टाकणाºया स्टरलाइट टेक कंपनीच्या खोदकामादरम्यान रिलायन्स जिओ इन्फोकॉम कंपनीचे केबल व चक्क पाच-पाच पाइप मनपा प्रशासनाच्या तपासणीत आढळून आले आहेत. हा प्रकार ध्यानात येताच मनपा प्रशासनाने शहरात विविध ठिकाणी खोदकाम केले असता, मोबाइल कंपन्यांचे पितळ उघडे पडले आहे. या प्रकरणाची दखल घेत केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी १० जानेवारीच्या आढावा बैठकीत मोबाइल कंपन्यांच्या कामावर प्रचंड नाराजी व्यक्त केली होती.कंपन्यांनी संधी गमावली! केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी आढावा बैठकीत मोबाइल कंपन्यांचे केबल खंडित करण्यापूर्वी त्यांना परवानगीचे दस्तऐवज सादर करण्यासाठी संधी देत १६ जानेवारी रोजी मनपा आयुक्तांना बैठक घेण्याचे निर्देश दिले. १६ जानेवारी रोजी आयुक्तांच्या दालनात देशातील नामवंत कंपनीच्या ‘आरओडब्ल्यू’च्या उपाध्यक्षांनी कंपनीने शहरात अनधिकृत केबल टाकल्याची कबुली दिली होती; परंतु मनपाच्या परवानगीची कागदपत्रे सादर केली नाहीत, हे विशेष. अर्थात, केंद्रीय राज्यमंत्र्यांनी दिलेली संधी कंपन्यांनी गमावल्याचे समोर आले.

कागदपत्रांची पूर्तता केली पण... मनपा आयुक्तांच्या दालनात पार पडलेल्या बैठकीत मोबाइल कंपन्यांनी परवानगीचे दस्तऐवज सादर करण्यासाठी सायंकाळपर्यंतचा अवधी मागितला. त्यानंतर १७ जानेवारी रोजी जाणीवपूर्वक सायंकाळी उशिरा कागदपत्रे सादर केली. त्याची शनिवारी बांधकाम विभागाने पडताळणी केली असता, ते अपूर्ण असल्याची माहिती आहे.

उपअभियंत्याची हकालपट्टी होणार का? मनपाचे मीठ खाऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाºया बांधकाम विभागातील एका कंत्राटी उपअभियंत्याने ‘दक्षिणा’ घेऊन आजवर प्रशासनाने केलेल्या प्रत्येक कारवाईची एका नामवंत मोबाइल कंपनीला इत्थंभूत माहिती पोहोचविली. प्रशासनाच्या प्रत्येक हालचालीवर कंपनीचा अप्रत्यक्ष ‘वॉच’ असल्याने संबंधित कंत्राटी उपअभियंत्याची आयुक्त संजय कापडणीस हकालपट्टी करतील का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका