शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एकाच दिवशी चौघांचा मृत्यू; १८ नवे पॉझिटिव्ह; ५८ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 18:08 IST

जिल्ह्यात आणखी चौघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कोरोनाबाधितांच्या बळींचा आकडा १४१ वर गेला आहे.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, या संसर्गजन्य आजाराला बळी पडणाऱ्यांची व लागण होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. बुधवार, १९ आॅगस्ट रोजी जिल्ह्यात आणखी चौघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कोरोनाबाधितांच्या बळींचा आकडा १४१ वर गेला आहे. तर १८ नवे पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ३३३१ झाली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून बुधवारी दिवसभरात आरटीपीसीआर’ चाचणीचे १३७ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १८ जण पॉझिटिव्ह असून, उर्वरित ११९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पाच महिला व नऊ पुरुष आहेत.यामध्ये मुर्तिजापूर येथील पाच व बार्शिटाकळी येथील दोन जणांसह गौरक्षण रोड, गायत्री नगर, पिंजर ता.बार्शिटाकळी, राजणखेड ता.बार्शिटाकळी, हातगाव ता. मुर्तिजापूर व बेलखेड ता. तेल्हारा, भीम नगर, डाबकी रोड, अकोट व मुर्तिजापूर येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.चौघांंचा मृत्यूकोरोनावर उपचार घेत असलेल्या चौघांचा बुधवारी मृत्यू झाला. यामध्ये गुलजारपूरा येथील ३५ वर्षीय महिला, कोठारी-पैलपाडा येथील ६५ वर्षीय पुरुष, तेल्हारा तालुक्यातील बेलखेड येथील ८२ वर्षीय पुरुष व रायखेड येथील ७० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. गुलजारपूरातील महिलेस १६ आॅगस्ट रोजी, पैलपाडा येथील रुग्णास १० आॅगस्ट रोजी, बेलखेड येथील रुग्णास १७ आॅगस्ट रोजी, तर रायखेड येथील रुग्णास १६ आॅगस्ट रोजी दाखल करण्यात आले होते.५८ जणांना डिस्चार्जबुधवारी दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १७, कोविड केअर सेंटर येथून तीन, उपजिल्हा रुग्णालय मूर्तिजापूर येथून पाच, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन, हॉटेल रेजीन्सी येथून एक, कोविड केअर सेंटर, हेंडज मुर्तिजापूर येथून २२, तर कोविड केअर सेंटर, अकोट येथून आठ अशा एकूण ५८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.३७३ जणांवर उपचार सुरुजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३३३१ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल २८१७ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १४१ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ३७३ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या