शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांच्या लूट प्रकरणी अधिष्ठातांनी दिली चौघांची नावे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 15:10 IST

अधिष्ठाता डॉ. शिवहरी घोरपडे यांनी पोलीस अधीक्षकांना चौघांची नावे देऊन त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

अकोला: सर्वोपचार रुग्णालयात दलालांकडून गरीब रुग्णांची लूट थांबविण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. याप्रकरणी अधिष्ठाता डॉ. शिवहरी घोरपडे यांनी पोलीस अधीक्षकांना चौघांची नावे देऊन त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात जिल्ह्यासह लगतच्या बुलडाणा, वाशिम आणि हिंगोली जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी येतात. या ठिकाणी रुग्णांना उपचारासंदर्भात योग्य माहिती मिळत नसल्याने हेलपाटे घ्यावे लागतात. हीच बाब हेरून येथील दलाल मदतीच्या नावाखाली रुग्णांची आर्थिक लूट करीत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने २५ डिसेंबर रोजी प्रसिद्ध केले होते. यासंदर्भात आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा यांनी अधिष्ठाता यांच्या दालनात बैठक घेऊन दलालांचा बंदोबस्त लावण्याबाबत सूचना दिल्या होत्या. या बैठकीनंतर १५ जानेवारी रोजी अधिष्ठाता डॉ. शिवहरी घोरपडे यांनी याप्रकरणी पोलीस अधीक्षकांना चौघांची नावे दिली असून, त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. यामध्ये आनंद शर्मा, दीपक खाडे, नितीन सपकाळ आणि आशिष सावळे यांचा समावेश असून, त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.डॉक्टरांच्या मर्जीतील दलाल मात्र मोकाटअधिष्ठाता डॉ. शिवहरी घोरपडे यांनी रुग्णांच्या लूट प्रकरणी चौघांवर कारवाईची मागणी केली; मात्र डॉक्टरांच्या मर्जीतील दलाल मोकाटच असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वी रानडुकराच्या लाभासाठी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी एकाला पकडले होते. त्याविरोधात डॉ. चव्हाण यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रारही दिली होती.

सर्वोपचार रुग्णालय परिसरात रुग्णांची लूट होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. यावर अंकुश लावण्यासाठी पोलीस अधीक्षकांकडे संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. याप्रकरणी चौघांची नावे पोलीस अधीक्षकांना दिली आहेत.- डॉ. शिवहरी घोरपडे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय