शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

चार आरोपींना पोलीस कोठडी, इतर दोघांची कारागृहात रवानगी

By admin | Updated: August 12, 2015 01:33 IST

मनोज धुमने हत्याकांड प्रकरण.

अकोला : गुलजारपुरा येथील मनोज धुमने हत्याकांड व जय वाडेकर यांच्यावरील प्राणघातक हल्ल्यातील सहाही आरोपींना पोलीस कोठडी संपल्याने मंगळवारी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी डी. बी. हरणे यांच्या न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने यामधील दोन आरोपींची न्यायालयीन कोठडी तर इतर चार आरोपींना १४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत सुनावली आहे. गुलजारपुर्‍यातील रोकडिया हनुमान मंदिरासमोर कर्णकर्कश आवाजात विशिष्ट प्रकारची गाणी वाजविल्यावरून झालेल्या वादानंतर मनोज धुमने आणि त्याचा मित्र जय वाडेकर यांच्यावर विभिन्न धर्मातील युवकांनी तलवार, पाइपसह काठय़ांनी हल्ला चढविला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मनोजचा मृत्यू झाला, तर जय वाडेकर याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा व डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने सहा आरोपींना अटक केली. यामध्ये मोहम्मद अजीम नासीर अहमद, इमरान हुसेन इरफान हुसेन, शेख महेबूब शेख इलियास आणि त्याचाच भाऊ शेख अकील शेख इलियास, इम्रान खान बिस्मिल्ला खान व शेख जावेद शेख बिस्मिल्ला यांचा समावेश आहे. या सहाही आरोपींची मंगळवार ११ ऑगस्ट रोजी पोलीस कोठडी संपल्याने त्यांना डाबकी रोड पोलिसांनी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी डी. बी. हरणे यांच्या न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने मोहम्मद अजीम नासीर अहमद व इमरान हुसेन इरफान हुसेन या दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. तर शेख महेबूब शेख इलियास, शेख अकील शेख इलियास, इम्रान खान बिस्मिल्ला खान व शेख जावेद शेख बिस्मिल्ला या चार आरोपींना १४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या हत्याकांड प्रकरणातील आणखी काही आरोपी फरार असून, डाबकी रोड पोलीस या आरोपींचा शोध घेत आहेत.त्यासाठी काही ठिकाणी पथकेही पाठविण्यात आली होती.