शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

चार आरोपींना पोलिस कोठडी

By admin | Updated: October 6, 2014 01:43 IST

अकोला येथील गायकवाड हत्याकांड; आरोपींना १३ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी.

अकोला : भारती प्लॉटमधील सारंग गायकवाड याची हत्या करणार्‍या चौघा आरोपींना रविवारी प्र थमश्रेणी न्यायदंडाधिकारी डी.व्ही. हरणे यांच्या न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपींना १३ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. आरोपींना हजर करण्यापूर्वी न्यायालय परिसरात शस्त्रधारी पोलिसांना तैनात करण्यात आले होते. यावेळी डाबकी रोड परिसरातील शेकडो युवकांनी न्यायालयात गर्दी केली होती. छेडखानीच्या वादातून गुंड सारंग अशोक गायकवाड (२२) याची शनिवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास डाबकी रोडवरील मास्टर पॉवर जिमजवळ वानखडेनगरातील अभिषेक खरसाळे, संतोष चि तोडे आणि सोपीनाथनगरातील निखिल सहारकर, सतीश भोसले यांनी दगड व चाकूने वार करून त्याला जखमी केले. सारंगचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. डाबकी रोड परिसरात युव तींची छेडखानी करणारा, किरकोळ वादातून धमक्या देऊन मारहाण करणारा बाळापूर नाक्यावरील भारती प्लॉटमधील सारंग गायकवाड याचा यापूर्वीसुद्धा आरोपींसोबत वाद झाला होता. त्यानंतर त्यांच्यात समेटही झाला; परंतु सारंग गायकवाड हा आरोपींना नेहमीच जीवे मारण्याच्या धमक्या द्यायचा. त्यातूनच हे हत्याकांड घडले. आरोपींना न्यायालयात हजर करतेवेळी पोलिसांनी विशेष काळजी घेतली. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत आरोपींना न्यायालयात आणले होते. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी हरणे यांच्या न्यायालयात आरोपींना हजर केल्यावर डाबकी रोडचे ठाणेदार भारत रक्षाकर यांनी आरोपींना आठ दिवसांपर्यंत कोठडी देण्याची मागणी केली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपींना न्यायालयाने १३ ऑक्टोबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.