लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळावरील पंचबोल पॉर्इंटच्या दरीत एक युवक पाय घसरून कोसळल्याची घटना सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मात्र तो शंभर फुटांवरील झाडात अडकल्याने त्याचे प्राण बचावले.रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास रेस्क्यू आॅपरेशन राबवून त्याला जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आले. विनोद ज्ञानदेव तितरे (२३,रा.कारंजा रमजानपूर, ता. बाळापूर, जि. अकोला) असे जखमी युवकाचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार, सोमवारी दुपारच्या सुमारास विनोद त्याच्या पाच मित्रांसह चिखलदरा येथे फिरण्यासाठी आला होता.दरम्यान विविध ठिकाणी भेट दिल्यावर सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास ते पंचबोल पॉर्इंटवरील धबधबा पाहण्यासाठी आले होते. यावेळी वाकून पाहताना त्याचा पाय घसरला.त्याला वाचविण्यासाठी त्याचा मित्र योगेश गावंडे याने दोर घेऊन खाली उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अपयशी ठरला.यानंतर स्थानिकांच्या मदतीने रेस्क्यू आॅपरेशन राबवून त्याला बाहेर काढण्यात आले. प्रवीण कळदाते, वासुदेव तितरे, सूरज कोगदे, महादेव दांडगे त्याच्यासोबत आले होते, अशी माहिती त्यांचा वाहन चालक प्रवीण कराळे याने दिली.
कारंजाचा युवक पाय घसरून दरीत कोसळला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 02:33 IST
अकोला : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळावरील पंचबोल पॉर्इंटच्या दरीत एक युवक पाय घसरून कोसळल्याची घटना सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मात्र तो शंभर फुटांवरील झाडात अडकल्याने त्याचे प्राण बचावले.
कारंजाचा युवक पाय घसरून दरीत कोसळला!
ठळक मुद्देचिखलदरा : पंचबोल पॉइंटधबधबा पाहताना घडली घटना स्थानिकांनी राबविले 'रेस्क्यू आॅपरेशन'