शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

समाज क्रांती आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मुकुंद खैरे यांचे कोरोनामुळे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 11:41 IST

Mukund Khaire dies due to corona : सकाळी ९:३० वाजता अकोला येथील खासगी रुग्णालयात कोरोनामुळे निधन झाले.

ठळक मुद्देगत आठवड्यात पत्नीचे तर २ मे रोजी मुलीचे कोरोनामुळे निधन झाले. मुकुंद खैरे हे अनेक दिवसांपासून कोरोना आजाराशी लढा देत होते.

मूर्तिजापूर : समाज क्रांती आघाडी या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते अॅड. प्रा. मुकुंद खैरे यांचे बुधवारी सकाळी ९:३० वाजता अकोला येथील खासगी रुग्णालयात कोरोनामुळे निधन झाले. ते ६३ वर्षाचे होते.           प्रा. मुकुंद खैरे हे अनेक दिवसांपासून कोरोना आजाराशी लढा देत होते. सोबतच त्यांच्या पत्नी व मुलगी यांनाही कोरोनाची लागन झाली होती. गत आठवड्यात पत्नीचे तर २ मे रोजी मुलीचे कोरोनामुळे निधन झाले. त्यानंतर ५ मे रोजी उपचारादरम्यान अकोला येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांनी येथील गाडगे महाराज महाविद्यालयात राज्य शास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत असतानाच समाज क्रांती आघाडी या सामाजिक संस्थेची ६ डिसेंबर १९९१ रोजी स्थापना केली. ही संघटना पुढे नेत त्यांनी संघटनेचे देशभर जाळे विणले. ते राज्य घटनेचे गाढे अभ्यासक होते. त्यांनी अनेक आंदोलने करुन शोषितांच्या हक्कासाठी लढा दिला.        समाज क्रांती आघाडी या सामाजिक आंदोलन करणाऱ्या संघटनेची चैत्यभूमी मुंबई येथे  स्थापना .बुद्ध गया मुक्ती आंदोलन, संविधान बचाव, राजकारणाला भ्रष्ट्राचातून मुक्तीचे आंदोलन, दसरा छोडो २४ऑक्टोबर का स्वीकार करो,भूमिहीनांचे प्रश्न,आरोग्याच्या अधिकारा साठी लढा देत झटले.       १० वर्षांपासून प्रत्यक्ष राजकारणात प्रवेश विधानसभा आणि लोक सभा निवडणूक लढविली .आदिवसिंचे प्रश्न धसास लावले .संविधानाचे गाढे अभ्यासक, प्रभावी वक्ते, कुशल संघटक म्हणून ख्याती होती. आंबेडकरांच्या विचाराने प्रभावित. बहुजनांमधे त्यांची सदैव आस्था होती. आठ दिवसापूर्वी पत्नी छायाताई खैरे ,शताब्दी मुलगी कोरोनाने यांचे निधन झाले. कोणताही राजकीय वारसा नसताना राजकारणात स्वतंत्र प्रतिमा त्यांनी निर्माण केली. त्यांच्या अकाली जाण्याने मूर्तिजापूर नागरीवर शोककळा पसरली. सामाजिक व राजकीय स्तरातून अनेकांनी आपल्या शोक संवेदना व्यक्त केल्या.

टॅग्स :AkolaअकोलाMurtijapurमुर्तिजापूरcorona virusकोरोना वायरस बातम्या