शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

माजी मंत्री गुलाबराव गावंडे यांना तीन महिन्यांची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 10:54 IST

बळेगाव फाट्यावर रस्त्याचे काम सुरू असताना ३१ मे २०१३ रोजी माजी मंत्री गुलाबराव गावंडे हे कार्यकर्त्यांसह तेथे पोहोचले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी माजी मंत्री गुलाबराव रामराव गावंडे यांना अकोटच्या न्यायालयाने ३ डिसेंबर रोजी दोषी ठरवत तीन महिन्यांचा कारावास तसेच २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यास इजा पोहोचवल्याप्रकरणी एक महिन्याचा कारावास व ५०० रुपये दंड ठोठावला आहे. या प्रकरणातील दुसरे आरोपी तत्कालीन आमदार गजानन दाळू यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.अकोट-अकोला रस्त्यावरील बळेगाव फाट्यावर रस्त्याचे काम सुरू असताना ३१ मे २०१३ रोजी माजी मंत्री गुलाबराव गावंडे हे कार्यकर्त्यांसह तेथे पोहोचले होते. यावेळी त्यांनी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करून थांबविले होते. तसेच घटनास्थळावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता मनोज पृथ्वीराजसिंह बैस यांना बोलावले होते. तेथे पोहोचल्यानंतर गावंडे यांनी आपल्याबरोबर वाद घातला. तसेच भ्रष्टाचाराचा आरोप करीत पेटवून देण्याची धमकी दिली. याचवेळी त्यांच्या एका कार्यकर्त्याने आपल्या अंगावर कॅनमधील रासायनिक द्रव्य फेकले, असा आरोप बैस यांनी दिलेल्या फिर्यादीत केला होता. तसेच पाकळ हे मला वाचवण्यासाठी आले असता त्यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचेही बैस यांनी फिर्यादीत म्हटले होते. या प्रकरणाचा अकोट पोलिसांनी तपास करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले होते. अकोट येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश मनीष गणोरकर यांनी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतला. सरकारी वकील अजित देशमुख यांनी या प्रकरणी आठ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवल्या. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायाधीश गणोकर यांनी माजी मंत्री गुलाबराव गावंडे यांना सरकारी रस्त्याच्या बांधकामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तीन महिन्यांची शिक्षा व २ हजार रुपयांचा दंड तसेच दंड न भरल्यास एक महिन्याची शिक्षा, तसेच कर्तव्यावरील सरकारी कर्मचाºयास इजा पोहोचवल्याप्रकरणी एक महिन्याचा कारावास व ५०० रुपये दंड, हा दंड न भरल्यास सात दिवसांची शिक्षा ठोठावली आहे. दोन्ही शिक्षा आरोपीने एकत्रित भोगायच्या आहेत. या प्रकरणी सरकारी पक्षाच्या वतीने अजित देशमुख व आरोपीतर्फे अ‍ॅड. गांधी यांनी युक्तिवाद केला.गावंडे म्हणतात, आंदोलन जनहितासाठी

  • अकोला रस्त्यावरील बळेगाव फाट्यावर सुरू असलेल्या रस्ता कामामुळे जनता त्रस्त झाली होती. त्या मार्गावरून जाताना ३१ मे २०१३ रोजी तिथे गर्दी जमलेली दिसली. त्यावेळी थांबलो तर लोकांनी सदर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करून थांबविले होते, हे लक्षात आले.
  • यावेळी घटनास्थळावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यांच्यासोबत कार्यकर्त्यांचा चांगलाच वाद झाला. मी न्यायालयाचा आदरच करतो, निकालाचा पूर्ण सन्मान ठेवून मी सांगू इच्छितो की, ते आंदोलन जनआंदोलन होते.
  • सामान्यांच्या प्रश्नासाठी मी मागे हटणारा नाही; मात्र जनआंदोलनाबाबत असा निर्णय येत असेल, तर वरील न्यायालयात अपील केले जाईल.
टॅग्स :AkolaअकोलाCourtन्यायालयGulabrao Gavandeगुलाबराव गावंडे