अकोला : रेल्वे स्टेशन परिसरातील महावीर भोजनालयासमोर माजी आमदार बी. ए. मुल्लर यांनी धिंगाणा घालत भोजनालयाच्या मालकास अश्लील शिवीगाळ केल्याची घटना सोमवारी रात्री ९ वाजता घडली. या प्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी भोजनालय संचालकाच्या तक्रारीवरून माजी आमदाराविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. रेल्वे स्टेशन चौकात असलेल्या महावीर भोजनालयासमोर माजी आमदार बी. ए. मुल्लर काही कामानिमित्त कार्यकर्त्यांसह गेले होते. यावेळी महावीर भोजनालयासमोर उभ्या असलेल्या ऑटोचालकासोबत क्षुल्लक कारणावरून त्यांचा वाद झाला. वाद वाढत असल्याचे बघून वाद सोडविण्यासाठी महावीर भोजनालयाचे मालक रवी जैन मध्यस् थतीसाठी गेले. मुल्लर यांनी त्यांच्याशीसोबतही वाद घालण्यास सुरुवात केली. या वादानंतर मुल्लर यांनी रवी महावीर जैन यांना अश्लील शिवीगाळ केली. या प्रकरणाची तक्रार रवी जैन यांनी रामदासपेठ पोलीस ठाण्यात केल्यानंतर पोलिसांनी मुल्लर यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. या घटनेसंदर्भात आ. मुल्लर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.
माजी आमदाराची भोजनालय मालकास शिवीगाळ
By admin | Updated: September 1, 2015 02:00 IST