नांदुरा (जि. बुलडाणा): अज्ञात वाहनाच्या धडकेत नांदुरा येथील माजी नगरसेवक राजेश जनार्धन नाईक (४७) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी २.३0 वाजतादरम्यान नांदुरा-खामगाव मार्गावर सैनिक ढाब्याजवळ घडली. राजेश नाईक हे एमएच २८ एए ४८२३ या क्रमांकाच्या मोटारसायकलने नांदुरा येथून खामगाव येथे जात असताना सैनिक ढाब्याजवळ त्यांच्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती नांदुरा येथे होताच अनेकांनी घटनास् थळी धाव घेतली.
नांदु-याचे माजी नगरसेवक अपघातात ठार
By admin | Updated: June 6, 2016 02:21 IST