शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

तनमोराच्या संवर्धनासाठी सरसावला वन विभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 19:56 IST

नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या तनमोर या  अतिदुर्मीळ पक्ष्याचे संवर्धन करण्यासाठी वन विभाग  सरसावला आहे. तनमोराचा अधिवास ओळखून त्याचे  संवर्धन कसे करावे, याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी  अकोला वन विभाग, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, वाइल्ड  लाइफ इन्स्टिट्यूट ऑप इंडिया, द कार्बेट फाउंडेशन यांच्या  संयुक्त विद्यमाने अकोल्यातील निसर्ग परिचय केंद्र येथे  रविवार, १७ सप्टेंबर रोजी कार्यशाळा पार पडली.

ठळक मुद्देवनरक्षकांची कार्यशाळा ‘एनजीओं’चाही सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या तनमोर या  अतिदुर्मीळ पक्ष्याचे संवर्धन करण्यासाठी वन विभाग  सरसावला आहे. तनमोराचा अधिवास ओळखून त्याचे  संवर्धन कसे करावे, याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी  अकोला वन विभाग, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, वाइल्ड  लाइफ इन्स्टिट्यूट ऑप इंडिया, द कार्बेट फाउंडेशन यांच्या  संयुक्त विद्यमाने अकोल्यातील निसर्ग परिचय केंद्र येथे  रविवार, १७ सप्टेंबर रोजी कार्यशाळा पार पडली.तनमोर हा अत्यंत दुर्मीळ असा पक्षी असून, या पक्ष्याची प्रजा ती झपाट्याने नामशेष होत आहे. मुख्यत्वे गवताळ मैदानांवर  आढळून येणारा हा पक्षी अत्यंत लाजाळू असून, आज रोजी  देशात केवळ ११00 ते १२00 तनमोर आढळून येतात.  महाराष्ट्रात फक्त अकोला, वाशिम व यवतमाळ या पट्टय़ात  तनमोराचा अधिवास आढळून येतो. लुप्त होत चाललेली  तनमोराची प्रजाती वाचविण्यासाठी वन विभागाकडून प्रयत्न  सुरू आहेत. याच अनुषंगाने रविवारी निसर्ग परिचय केंद्रात  कार्यशाळा पार पडली. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी उ पवनसंरक्षक पी. जी. लोणकर होते. यावेळी मंचावर शिवाजी  महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. आय. ए.  राजा, मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे व शास्त्रज्ञ सुजीत  नरवाडे उपस्थित होते. कार्यशाळेत तणमोराबाबत सखोल  माहिती देण्यात आली, तसेच हा पक्षी पाहण्यासाठी गरजेच्या  असलेल्या संयत्राचा वापर कसा करावा, तणमोराचा  अधिवास कसा शोधावा, याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.  संचालन व प्रास्ताविक वन्यजीव कक्ष प्रमुख गोविंद पांडे  यांनी केले, तर आभार वन परिक्षेत्र अधिकारी कातखेडे यांनी  केले.आज प्रत्यक्ष पाहणीअकोला जिल्हय़ात सिसा-मासा, येळवण या भागात तणमोर  पक्षी आढळून येतो, तसेच वाशिम जिल्हय़ातील कारंजा  तालुक्यातही हा पक्षी आढळतो. अकोला जिल्हय़ात केवळ  ५ ते ६ तणमोर पक्षी असल्याची नोंद आहे. कार्यशाळेचा एक  भाग म्हणून सोमवार, १८ सप्टेंबर रोजी तणमोराच्या  अधिवासाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार आहे.