शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पातूर तालुक्यातील चारमोळीत शिवारात वन विभागाने केले बिबट्याच्या पिल्लाला जेरबंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 02:30 IST

पातूर तालुक्यातील चारमोळी शिवारात शनिवारी सकाळपासून मुक्त संचार करणार्‍या बिबटाच्या पिल्लाला वनविभागाच्या पथकाने रविवारी यशस्वीरित्या जेरबंद करुन परत जंगलात सोडले.

ठळक मुद्देदुर्गम भागातील चारमोळी शिवारात गेल्या दोन दिवसांपासून होता वावरकुत्रे मागे लागल्याने चढून बसले होते पळसाच्या झाडावर वनविभागाच्या पथकाने जेरबंद केलेले बिबट्याला सोडले जंगलात 

लोकमत न्यूज नेटवर्कपातूर (अकोला): तालुक्यातील चारमोळी शिवारात शनिवारी सकाळपासून मुक्त संचार करणार्‍या बिबटाच्या पिल्लाला वनविभागाच्या पथकाने रविवारी यशस्वीरित्या जेरबंद करुन परत जंगलात सोडले. जंगलातील पाणवठय़ांनी सध्या तळ गाठला आहे. त्यामुळे, पाण्याच्या शोधात वन्य प्राणी गावात येत आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांपासून गावाजवळ एक बिबट आल्याचे ग्रामस्थांना दिसले होते. २0 जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता बिबटचे एक पिल्लू गावात शिरले. गावातील कुत्रे त्याच्या मागे लागल्याने ते चारमोळी शिवारातील एका पळसाच्या झाडावर चढले. गावाच्या जवळच हा भाग असल्याने ग्रामस्थांना याविषयी माहिती मिळाली. माजी सरपंच रामा ठाकरे यांनी वन विभागाला याविषयी माहिती दिली. बिबट सापडल्याची माहिती मिळताच वन विभागाचे बंडकर व त्यांचे सहायक तसेच गावातील रामा ठाकरे, महादेव जांभकर, श्यामराव ठाकरे, वामन खुळे, मोहन लोखंडे, बजरंग गाढवे आदींनी घटनास्थळावर धाव घेतली. तसेच बिबटला दोरीच्या साहायाने पकडून चारमोळीच्या जंगलात सोडून दिले. दुर्गम भागात असलेल्या चारमोळी गावात बिबटचा वावराने दहशत पसरली आहे. यापूर्वीही बिबटने गावातील एक गाय आणि गोर्‍हा फस्त केलेला आहे. 

कुत्र्यांच्या भीतीने बिबट चढले झाडावर!बिबट शनिवारी सकाळी चारमोळी गावात दाखल झाले होते. यावेळी गावातील कुत्र्यांनी त्याचा पाठलाग केला. कुत्र्यांच्या भीतीने बिबट गावा शेजारील शेतशिवारात पळसाच्या झाडावर चढले. याविषयी माहिती मिळताच ग्रामस्थांनी झाडाभोवती    मोठी गर्दी केली होती.  

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणleopardबिबट्या