तेल्हारा, दि. ३0- लोखंडी रॉडने पाच माकडांना मारहाण केल्याची घटना २७ जानेवारी रोजी घडली होती. या प्रकरणातील एका आरोपीची चौकशी केल्यानंतर यामध्ये तिघांचा समावेश असल्याचे समोर आले होते. तिन्ही आरोपींना १ फेब्रुवारीपर्यंंत वनकोठडी सुनावली आहे. लोखंडी रॉडनेही ही मारहाण करण्यात आल्याने दोन माकडे जागीच गतप्राण झाली होती, तर तीन माकडं गंभीर जखमी झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी संतोष महादेव खारोडे यास अटक केली होती. या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी केली असता, संतोष किसन खारोडे व गजानन वासुदेव सावळे यांनी मारहाण केल्याचे समोर आले आहे. तेल्हारा पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या तिन्ही आरोपींना तेल्हारा पोलिसांनी अटक करून ३0 जानेवारी रोजी न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने तिन्ही आरोपींना १ फेब्रुवारी २0१७ पर्यंंंत वनकोठडी सुनावली आहे. दरम्यान, मृत दोन माकडांवर २८ जानेवारी रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले, तर जखमी माकडांवर वन विभागाच्या देखरेखीखाली अकोट येथे उपचार करण्यात येत आहेत. या माकडांची प्रकृती सुधारल्यानंतर त्यांना जंगलात सोडून देण्यात येणार,असे सूत्रांनी सांगितले.
माकडांना ठार करणा-या तिघांना वन कोठडी
By admin | Updated: January 31, 2017 02:36 IST