शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

अवैध सावकारीप्रकरणी ११ व्यावसायिकांविरुद्ध फौजदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 01:28 IST

अकोला : बनावट दस्तावेजाद्वारे आर्थिक व्यवहार करणे तसेच  अवैध सावकारीच्या माध्यमातून एका शेअर ब्रोकरची लाखो रु पयांनी फसवणूक करणार्‍या शहरातील ११ व्यावसायिकांविरुद्ध  सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री उशिरा कट  रचण्यासह अवैध सावकारीचे गुन्हे दाखल केले आहेत. 

ठळक मुद्देया ११ व्यापारी, प्रतिष्ठानांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : बनावट दस्तावेजाद्वारे आर्थिक व्यवहार करणे तसेच  अवैध सावकारीच्या माध्यमातून एका शेअर ब्रोकरची लाखो रु पयांनी फसवणूक करणार्‍या शहरातील ११ व्यावसायिकांविरुद्ध  सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री उशिरा कट  रचण्यासह अवैध सावकारीचे गुन्हे दाखल केले आहेत. सुधीर कॉलनी येथील रहिवासी तसेच शेअर ब्रोकर अनुप  गुलाबराव आगरकर नामक व्यक्तीने अनुप माहेश्‍वरी  (डोडिया)कडून २३ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. या  कर्जाच्या मोबदल्यासाठी ३३0 धनादेश अनुप आगरकरने  माहेश्‍वरी याला दिले होते. कर्ज स्वरूपात घेतलेल्या २३ लाख  रुपयांचे तब्बल ७८ लाख रुपये व्याजासह परतफेड करण्यात  आले होते; मात्र त्यानंतर माहेश्‍वरीने  ३ ते ७ टक्के दरमहा  दरशेकडा व्याजदराने अनुप आगरकरकडून रक्कम वसुली सुरू  केली होती. एवढेच नव्हे, तर सदर ३३0 धनादेशांपैकी काही  धनादेश ऋषभ मार्केटिंग, अनुपकुमार आशिषकुमार, जी. एम.  ट्रेडिंग, दीपक कृषी सेवा केंद्र संचालक दीपक झांबड, मराठा  कृषी सेवा केंद्राचे संचालक प्रभाकर गावंडे, अटल ट्रेडर्स, कोरपे  ब्रदर्स, राहुल राठी, राकेश राठी, आशिष माहेश्‍वरी यांना देऊन  त्यांनीही सदर धनादेशाद्वारे रक्कम उकळली होती. जनता बँक व एचडीएफसी बँकेच्या माध्यमातून हे व्यवहार पार  पडल्याचेही समोर आले आहे. धनादेशांचा गैरवापर करीत  विविध लोकांना ते देऊन बनावट दस्तावेजाद्वारे तसेच खोटी नावे  वापरून ही बेकायदा वसुली करण्यात आली आहे. प्रतिष्ठान  तसेच सदर व्यापार्‍यांना अशा प्रकारे वसुलीचे अधिकार नसताना  त्यांनी ही रक्कम उकळली असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख  गणेश अणे यांनी केलेल्या तपासात समोर आले आहे. त्यामुळे  आर्थिक गुन्हे शाखेने तपास केल्यानंतर या प्रकरणात सदर प्र ितष्ठान व व्यापार्‍यांविरुद्ध भादंविच्या कलम ४२0, ४६७,  ४६८, ४७१, १२0 ब, ३८४ तसेच महाराष्ट्र सावकारी  अधनियम २0१४ च्या कलम ३९ आणि ४५ नुसार गुन्हा दाखल  करण्यात आला आहे.

या ११ व्यापारी, प्रतिष्ठानांचा समावेशअवैध सावकारी व फसवणूक प्रकरणात ऋषभ मार्केटिंग, दी पक कृषी सेवा केंदाचे दीपक झांबड, आशिष माहेश्‍वरी, कोरपे  ब्रदर्स, अटल ट्रेडर्स, अनुपकुमार आशिषकुमार, अनुप डोडिया,  जी. एम. ट्रेडिंग, राहुल राठी, राकेश राठी, मराठा कृषी सेवा  केंद्राचे प्रभाकर गावंडे यांच्याविरु द्ध गुन्हे दाखल करण्यात आले  आहेत. सदर प्रकरण अत्यंत गुंतागुंतीचे असल्याने या प्रकरणत  आर्थिक गुन्हे शाखेने सखोल तपास केल्यानंतरच पुढील पावले  उचलण्याची मागणी होत आहे.

व्यवसायातील खेळत्या भांडवलाची गरज भागविण्यासाठी  हुंडीचिठ्ठीचा दलाल असलेले अनुप डोडिया यांच्याकडून एक  वर्षापूर्वी काही दिवसांसाठी रक्कम घेण्यात आली होती. सदर  रक्कम धनादेशाद्वारे घेण्यात आली व धनादेशाद्वारेच परत करण्या त आली. यामध्ये आपण कुणाचीही फसवणूक केली नसून,  आमचीच फसवणूक झाली आहे.- प्रभाकर गावंडे,जिल्हाध्यक्ष, कृषी व्यावसायिक संघ, अकोला.

टॅग्स :Crimeगुन्हा