शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

उर्दू शाळेत विद्यार्थ्यांना पाठविण्यासाठी सक्ती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 17:36 IST

मुलांना शाळेत पाठविण्यासाठी सक्ती करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.

अकोला : शासनाने शाळा सुरू करण्याचे निर्देश दिलेत; परंतु त्यातही अटी व नियम घालून दिले. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता, तूर्तास शाळा सुरू करणे धोकादायक असतानासुद्धा अकोट फैलातील मिल्लत उर्दू हायस्कूल व प्राथमिक शाळेतील पालकांकडून एकतर्फी संमतिपत्र भरून घेत, मुलांना शाळेत पाठविण्यासाठी सक्ती करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, शिक्षकांनाही पालकांच्या घरी पाठवून संमतिपत्र भरवून घेण्यासाठी सक्ती करण्यात येत आहे.कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या अकोट फैलमधील मिल्लत उर्दू हायस्कूल व प्राथमिक शाळेतील शिक्षकांना संस्थाचालक शिक्षक, शिक्षिकांना दररोज शाळेत बोलावत आहेत. त्यांना शाळा सुरू करण्यासाठी घरोघरी फिरून विद्यार्थ्यांच्या पालकांच्या भेटी घेण्यास बजावत आहेत. तसेच विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासाठी शिक्षण संस्थेने तयार केलेले संमतिपत्र पालकांकडून सक्तीने भरून घेण्यात येत आहेत. अकोट फैल हा परिसर अगोदर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेला असताना, पालकांच्या घरोघरी जाण्यास सांगितल्यामुळे शिक्षकही चांगलेच धास्तावले आहेत. संस्थाचालकांच्या दबावात येऊन शिक्षकांना काम करावे लागत असल्याने, ते काहीही बोलण्यास असमर्थ आहेत. हा भाग हॉटस्पॉट असल्यामुळे शाळा सुरू केली तर विद्यार्थी व शिक्षकांना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो; त्यामुळे मिल्लत उर्दू शिक्षण संस्थेचे व्यवस्थापन शाळा सुरू करण्याची घाई का करीत आहे, असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला. (प्रतिनिधी)शाळा सुरू न करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊनच शाळा सुरू करण्यास सांगितले जाईल. सध्या शाळा सुरू करण्याची घाई करू नये. कोणी शाळा सुरू करण्याचा प्रयत्न करीत असेल तर कारवाई करू.- प्रकाश मुकुंद,शिक्षणाधिकारी, माध्यमिकशिक्षकांना पालकांकडून संमतिपत्र भरून आणण्यासाठी कोणतीही सक्ती केली नाही. ते संमतीपत्र आमच्या शाळेने तयार केले नाहीत. कोरोनामुळे शाळा सुरू होणार नाही. प्रशासनाची व शिक्षण विभागाची परवानगी घेऊनच निर्णय घेण्यात येईल. शासनाच्या नियम व अटींचे पालन आम्ही करू. विनाकारण कोणीतरी अपप्रचार करीत आहे.-प्रा. सरफराज खान, प्राचार्य, मिल्लत उर्दू हायस्कूल

 

टॅग्स :AkolaअकोलाSchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्र