शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

फुटबॉलचे भीष्माचार्य अत्ताउर रहेमान कुरेशी काळाच्या पडद्याआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 02:02 IST

अकोला: अवघ्या महाराष्ट्रात फुटबॉल विश्‍वात ‘फुटबॉलचे भीष्माचार्य’ म्हणून ओळखल्या जाणारे अकोल्यातील ज्येष्ठ फुटबॉलपटू अत्ताउर रहेमान कुरेशी यांचे ११ जानेवारी रोजी वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले.

अकोला: अवघ्या महाराष्ट्रात फुटबॉल विश्‍वात ‘फुटबॉलचे भीष्माचार्य’ म्हणून ओळखल्या जाणारे अकोल्यातील ज्येष्ठ फुटबॉलपटू अत्ताउर रहेमान कुरेशी यांचे ११ जानेवारी रोजी वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले.११ एप्रिल १९२७ रोजी जन्मलेले अत्ताउर यांनी अकोला येथील सावतराम मिल फुटबॉल संघापासून फुटबॉल खेळाची सुरुवात केली. यानंतर नागपूर येथील यंग मुस्लीम क्लबमध्ये खेळले. याकाळात त्यांची एवढी ख्याती होती, की त्यांचा सामना कोणत्याही गावात असो त्यांचा चाहतावर्ग मैदानात गर्दी करीत असे. नागपूरला सामना असला, की त्यांचा चाहतावर्ग प्रेक्षक गॅलरीत त्यांचे फोटो घेऊन येत असे. मैदानात त्यांचे फोटो लावत होते. यंग मुस्लीम क्लबमधूनच त्यांनी राष्ट्रीय संघात प्रवेश घेतला होता.त्यानंतर त्यांना महाराष्ट्र परिवहन महामंडळ, अकोला विभाग येथे चालक (ड्रायव्हर) म्हणून नोकरी लागली. महाराष्ट्र एस.टी. फुटबॉल संघाचे ते कर्णधार होते. पुढे त्यांनी ग्रीन स्पोर्टस् क्लबची स्थापना करू न अनेक राष्ट्रीय फुटबॉलपटू घडविले. याच दरम्यान ते यंग मुस्लीम क्लब अकोलाकडून काही काळ खेळले. सोबतच फ्रेन्डस क्लबचे प्रशिक्षक म्हणूनही काम पाहिले. फुटबॉलसाठी संपूर्ण आयुष्य अताउर यांनी खर्ची केले. फुटबॉलकरिता त्यांचे एवढे वेड होते, की एस.टी.चालक सेवेत असताना एके ठिकाणी फुटबॉलचा सामना सुरू  असताना, त्यांनी प्रवासी बस थांबवून सामना पूर्ण बघितला, हा किस्सा अनेकवेळा ते हसून सांगत होते. तसेच जेव्हा त्यांचे वडील वारले होते. तेव्हा ते एका सामन्यात पंच म्हणून काम पाहत होते. वडील वारल्याचा निरोप त्यांना सामना सुरू  असताना मिळाला होता. मात्र, त्यांनी सामना अध्र्यावर न सोडता, सामना पूर्ण झाल्यानंतर पंचाची जी जबाबदारी असते, ते सोपस्कार पूर्ण पार पाडून मगच घर गाठले होते. अशा अनेक आठवणी आज त्यांच्या निधनानंतर ताज्या झाल्या. वयाची नवदी गाठल्यानंतरही ते सायकल घेऊन लालबहादूर शास्त्री क्रीडांगण येथील फुटबॉल मैदानात यायचे. शास्त्री स्टेडियममध्ये कोणतीही फुटबॉल स्पर्धा असली, की ते आवर्जून हजर राहून खेळाडूंना मार्गदर्शन करीत होते. त्यांच्या मागे एक मुलगा व एक मुलगी तसेच नातवंडं आहेत. 

टॅग्स :Akola cityअकोला शहरFootballफुटबॉल