शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

धान्य दानपेटीतून गोरगरिबांना धान्याचा आधार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 11:44 IST

बाळापूर पुरवठा विभागाच्या संकल्पनेतून ‘धान्य दानपेटी’ स्वस्त धान्य दुकानासमोर ठेवण्यात आली असून, या उपक्रमाचा प्रारंभ अंदुरा येथे सोमवारी झाला.

- संतोष गव्हाळेहातरुण : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने २१ दिवसांच्या ‘लॉकडाऊन’ची घोषणा केली. संचारबंदी व जमावबंदी असल्याने अशावेळी हातावर पोट भरणाऱ्या गोरगरीब आणि रोजगाराच्या शोधात आलेल्या परप्रांतीय नागरिकांच्या हाताला काम नाही, तसेच जवळ पैसा नाही. या कारणाने जगावे कसे, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला. बाळापूर पुरवठा विभागाच्या संकल्पनेतून ‘धान्य दानपेटी’ स्वस्त धान्य दुकानासमोर ठेवण्यात आली असून, या उपक्रमाचा प्रारंभ अंदुरा येथे सोमवारी झाला. यावेळी अंदुरा येथे ११ क्विंटल धान्य दान म्हणून मिळाल्याची माहिती पुरवठा निरीक्षक मोहन कोल्हे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.स्वस्त धान्य दुकानातून धान्य घेतल्यानंतर ज्या शिधापत्रिकाधारकाला गोरगरिबांना धान्य दान देण्याची इच्छा आहे त्यांनी स्वस्त धान्य दुकानासमोर असलेल्या धान्य दानपेटीत धान्य देऊन अन्नदान करायचे आहे. गावातील नागरिकही या धान्य दानपेटीत धान्य देऊ शकतात. बाळापूर तालुक्यातील ११४ स्वस्त धान्य दुकानासमोर ठेवण्यात येणाºया धान्य दानपेटीतील सर्व धान्य गोरगरीब आणि परप्रांतीय नागरिकांना वाटप करण्यात येणार आहे.स्व. महादेव कोल्हे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ निंबा येथील यमुनाबाई महादेव कोल्हे यांच्याकडून ५ क्विंटल गहू तसेच अंदुरा येथील रामदास शिंगोलकार यांच्याकडून ५ क्विंटल गहू, शेतकरी संजय घंगाळे, ज्ञानदेव रोहनकार, संजय वानखडे, रेखाबाई साबळे यांनी धान्य दानपेटीत सोमवारी दान केले.उपाशीपोटी कोणी राहू नये या हेतूने हा उपक्रम बाळापूर तालुक्यात राबविण्यास प्रारंभ झाला असून, धान्य दानपेटी उपक्रमास नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन बाळापूर तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी, पुरवठा विभागाचे निरीक्षक मोहन कोल्हे यांनी केले आहे.अंदुरा परिसरातील १८ परप्रांतीयांना मिळाले धान्य!रोजगाराच्या शोधात अंदुरा शेतशिवारात आलेल्या आणि सध्या शेतकरी संजय घंगाळे यांच्या शेतातील गोडाऊनमध्ये असलेल्या मध्यप्रदेशमधील १८ नागरिकांना बाळापूर तालुका पुरवठा विभागाच्या संकल्पनेतून साकारलेल्या धान्य दानपेटी उपक्रमातून सोमवारी गहू, तांदूळ असे क्विंटलभर धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे पुरवठा निरीक्षक मोहन कोल्हे, सामाजिक कार्यकर्ते मुकेश गव्हाणकर, संजय घंगाळे, संजय वानखडे, पोलीस पाटील ज्ञानदेव रोहनकार, नाना शिंगोलकार यांच्या हस्ते सोमवारी शेताच्या बांधावर जाऊन वाटप करण्यात आले. या १८ नागरिकांच्या समस्येवर ‘लोकमत’ मधून प्रकाशझोत टाकण्यात आला होता. हे विशेष!

 

टॅग्स :AkolaअकोलाBalapurबाळापूर