शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील कृषी विद्यापीठांचा दर्जा सुधारण्यावर भर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 14:11 IST

अकोला : राज्यातील कृषी विद्यापीठांचा दर्जा सुधारण्यावर भर देण्यात येत आहे.

अकोला : राज्यातील कृषी विद्यापीठांचा दर्जा सुधारण्यावर भर देण्यात येत असून, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा सर्वच अनुषंगाने दर्जा घसरल्याने भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (आयसीएआर) मानांकनात या कृषी विद्यापीठाचा क्रमांक ४८ वा आला होता. यात सुधारणा करण्यात आल्याने हा क्रमांक आता ४२ वर आला आहे. दरम्यान, यावर्षी आॅक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला ‘आयसीएआर’ची अधिस्वीकृती समिती आढावा घेण्यासाठी येणार असल्याचे कृषी विद्यापीठांनी कामाची गती वाढविली आहे.भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अधिस्वीकृती समितीने मागील तीन वर्षांपूर्वी राज्यातील कृषी विद्यापीठाचा आढावा घेतला होता. आढाव्यात कृषी विद्यापीठांचे शिक्षण, संशोधन व विस्तार काम समाधानकारक दिसले नव्हते, त्यामुळे ‘आयसीएआर’ने त्यावेळी कृषी विद्यापीठांची अधिस्वीकृती रद्द केली होती. त्याचे चांगलेच पडसाद उमटले होते. ही अधिस्वीकृती हटवून कृषी विद्यापीठांना संशोधनासाठीचा निधी मिळावा, यासाठीचे प्रयत्न शासनाला करावे लागले.२०१४ पर्यंत राज्यात खासगी कृषी महाविद्यालयांची संख्या भरमसाठ वाढली; पण कृषी विद्यापीठांची संचालक, विभाग प्रमुख, प्राध्यापक आदी अर्ध्यांच्यावर पदे रिक्त होती. शासनाने पदेच न भरल्याने शिक्षण, संशोधन व कृषी विस्तार कार्यांचा ताण हा अपूर्ण मनुष्यबळावर पडल्याने कृषी विद्यापीठांच्या प्राध्यापकांवर अतिरिक्त भार पडला होता. शासकीय महाविद्यालय तसेच खासगी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांची परीक्षा, उत्तरपत्रिका तपासणी आदी अतिरिक्त कामे त्यांना करावी लागत असल्याने शैक्षणिक गुणवत्ता ढासळली, संशोधनावरही परिणाम झाले. ‘आयसीएआर’च्या अधिस्वीकृती समितीला हे सर्व त्यावेळी ठळकपणे दिसले. यामुळेच आयसीएआरच्या पहिल्या दहा क्रमांकात राहणारे अकोल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ हे मानांकनात ४८ व्या क्रमांकावर पोहोचल्याचे समोर आले होते. आता यात थोडी सुधारणा झाली असून, हा क्रमांक ४२ वर आला आहे.

मनुष्यबळाचा प्रश्न हळूहळू सोडविला जात असून, कृषी विद्यापीठांतर्गत शिक्षण, संशोधन व विस्ताराचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे दर्जा सुधारेल, सर्व सहकाऱ्यांच्या सहयोगाने मानांकनात पुढे जाण्याचे प्रयत्न सुरू आहे.डॉ. व्ही. एम. भाले,कुलगुरू ,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ