शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

चित्रपटांमध्ये समाज प्रबोधनापेक्षा व्यावसायिकतेवर भर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 01:57 IST

एकेकाळी चित्रपट हे समाज प्रबोधन, संस्कृती, कलेवर भर देणारे असत. सध्या चित्रपटांकडे केवळ मनोरंजनाचे साधन म्हणून पाहिले जात आहे. चित्रपटांमधून समाज प्रबोधनापेक्षा आता व्यावसायिकतेवर भर दिला जात आहे. चित्रपट हे निव्वळ मनोरंजनाचे साधन बनू नये. 

ठळक मुद्देप्रा. अभिजित देशपांडे यांचे मत बाबूजी देशमुख वाचनालय नवरात्र व्याख्यानमाला

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला :  एकेकाळी चित्रपट हे समाज प्रबोधन, संस्कृती, कलेवर भर देणारे असत. सध्या चित्रपटांकडे केवळ मनोरंजनाचे साधन म्हणून पाहिले जात आहे. चित्रपटांमधून समाज प्रबोधनापेक्षा आता व्यावसायिकतेवर भर दिला जात आहे. चित्रपट हे निव्वळ मनोरंजनाचे साधन बनू नये. त्यातून समाजहित, प्रबोधन, संदेशसुद्धा दिला पाहिजे. चित्रपट समजून घेताना, रसिकांनी त्यामागील अर्थकारण समजून घेत, साक्षर झालं पाहिजे आणि कोणता चित्रपट पाहावा आणि कोणता पाहू नये, हे सुद्धा ठरविले पाहिजे, असे मत प्रा. अभिजित देशपांडे (मुंबई) यांनी व्यक्त केले. बाबूजी देशमुख वाचनालयातर्फे प्रमिलाताई ओक सभागृहात आयोजित नवरात्र व्याख्यानमालेत ते ‘चित्रपट समजून घेताना..’ विषयावर बोलत होते. गुरुवारी व्याख्यानमालेची सांगता करण्यात आली. यावेळी विचारपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष महादेवराव भुईभार, प्रा. नारायण कुळकर्णी कवठेकर, सचिव अनुराग मिश्र उपस्थित होते. प्रा. अभिजित देशपांडे यांनी, जगात निर्माण होणार्‍या अडीच हजार चित्रपटांपैकी भारतात दरवर्षी १२00 ते १५00 चित्रपट प्रदर्शित होतात. चीन, अमेरिकेपेक्षाही जास्त चित्रपट भारतात बनतात. माध्यमांनी समाज वेढलेला आहे. वेगाने प्रत्येक माहिती आपल्यापर्यंत पोहोचते. १८९६ पासून चित्रपट निर्मितीला प्रारंभ झाला. सुरुवातीला, त्यामध्ये समाज, प्रबोधन, गरिबी, दारिद्रय़ याला महत्त्व होते; परंतु आता चित्रपट केवळ मनोरंजनाचे साधन आहे. त्यातून मोठी अर्थप्राप्ती होत आहे. मनोरंजन आणि अर्थप्राप्तीतून चित्रपट निर्मिती होत आहे. त्यातून कोणतेही समाजहित जोपासले जात नाही. चित्रपट ही एक वैश्‍विक भाषा आहे; परंतु समाज, संस्कृतीच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास, त्याला रसिक फार कमी आहेत. चित्रपट निर्मिती करताना, त्याला तंत्रज्ञानाचा, कॅमेर्‍याचा आधार लागतो. चित्रपट ही समूह कला आहे. असे सांगत, देशपांडे यांनी अलीकडच्या काळात चित्रपटांमध्ये भंपक, बीभत्स आणि खोट्या कल्पना अधिक मांडल्या जातात. श्रीमंती, अहंकाराचे प्रदर्शन करणारे सध्याचे चित्रपट आहेत. खूपच कमी चित्रपट समाज, देश, संस्कृती, कलेवर भर देतात. ग्रामीण जीवन, शेतकर्‍यांच्या समस्यांसह अनेक विषय चित्रपटातून हाताळता येतात; परंतु त्यातून पैसा मिळत नाही. त्यामुळे रसिकांनीसुद्धा चोखंदळ, साक्षर होऊन चित्रपट बघावे, असे आवाहनही त्यांनी केले. रसिकांची प्रगल्भता वाढली, तर त्यांच्या वैचारिक पातळीचे चित्रपट निर्माण होतील, अशी आशाही प्रा. देशपांडे यांनी व्यक्त केली.