शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

अकोला रेल्वेस्थानकावरील ‘एफओबी’चे काम संथ गतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 12:36 IST

कंत्राटदारास दिलेला अवधी पूर्ण झालेला असतानाही कामाची गती वाढलेली नाही.

अकोला : अकोला रेल्वेस्थानकावर गत दोन वर्षांपासून एफओबीचे काम संथ गतीने सुरू असल्याने अकोलेकर प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.अकोला रेल्वेस्थानकावर दिवसेंदिवस वाढणारी प्रवाशांची गर्दी सावरण्यासाठी आणि प्रवाशांना सोयी-सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने अकोला रेल्वेस्थानकावर फूट ओव्हर ब्रीज उभारणीला मंजुरी दिली. कोट्यवधीचा निधी यासाठी मंजूर झाला. गत दोन वर्षांपासून या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली असली तरी ते काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. नागफणी रेल्वे वसाहतीजवळून निघणारा हा एफओबी अकोला रेल्वेस्थानकाच्या सर्व प्लॅटफार्मला जोडलेला राहणार आहे. त्यामुळे कोणत्याही प्लॅटफार्मवरूनची वाहतूक सोयीस्कर होणार आहे. अकोलेकरांसाठी हा एफओबी महत्त्वाचा ठरणार आहे; मात्र सदर काम संथ गतीने होत असल्याने पाचही प्लॅटफार्मवर तोडफोड सुरू आहे. प्लॅटफार्मवरील फरशी यासाठी उकलली गेली असून सिमेंटचे आणि लोखंडी रॅम्प उभारून ठेवले आहे. त्यामुळे अडसर निर्माण झाला आहे. कंत्राटदारास दिलेला अवधी पूर्ण झालेला असतानाही कामाची गती वाढलेली नाही. भुसावळ डीआरएम यांनीदेखील संथगतीने होत असलेल्या कामाबद्दल नाराजी व्यक्त केलेली आहे.केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या पुढाकाराची गरजअकोला रेल्वेस्थानकावरील एफओबीच नव्हे तर इतरही विकास कामांची गती धिमी झाली आहे. अकोल्याचे खासदार संजय धोत्रे केंद्रीय राज्यमंत्री झाल्यापासून झेडआरयूसीसी पदाधिकारी आणि डीआरएमच्या बैठकी व दौऱ्यांमध्ये नाहीत. त्याचा परिणाम विकास कामांवर जाणवत आहे. रेंगाळत असलेल्या विकास कामांचा आढावा केंद्रीय मंत्री धोत्रेंकडून होण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया अकोलेकर व्यक्त करीत आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Railway Stationअकोला रेल्वे स्थानक