शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

पुराचे पाणी शिरताच डाेळे उघडले; भूखंडांचे दर घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 10:56 IST

Akola real estate News : गीता नगर, अकाेली बु., चांदूर शिवार, हिंगणा, खडकी या भागातील जमिनीचे दर माेठ्या प्रमाणात घसरल्याचे समाेर आले आहे.

- आशिष गावंडे

अकाेला : शहरात २१ जुलैची मध्यरात्र अकाेलेकरांच्या मनात धडकी भरविणारी ठरली. पूरप्रवण क्षेत्रात उभारलेल्या व चढ्या दराने ग्राहकांच्या मस्तकी मारलेल्या ड्युप्लेक्स, सदनिकांमध्ये पुराचे पाणी शिरले. यामुळे घरातील लहान मुले, वयाेवृध्द नागरिकांचा जीव वाचविण्यासाठी धावपळ सुरु झाली. पूर ओसरल्यानंतर अशा भागातील ड्युप्लेक्स, सदनिकांसह भूखंड खरेदीकडे सुज्ञ ग्राहकांनी पाठ फिरवली असून मागील काही दिवसांत गीता नगर, अकाेली बु., चांदूर शिवार, हिंगणा, खडकी या भागातील जमिनीचे दर माेठ्या प्रमाणात घसरल्याचे समाेर आले आहे.

महापालिकेची हद्दवाढ हाेणार असल्याची कुणकूण लागताच २०१५ मध्ये शहरातील काही लाेकप्रतिनिधी, भूखंड माफियांनी गीता नगर, अकाेली बु., हिंगणा, चांदूर शिवार, खडकी, गंगा नगर, शिवनी आदी परिसरात माेठ्या प्रमाणात शेती व भूखंड खरेदी केले. सप्टेंबर २०१६ मध्ये हद्दवाढ हाेताच कृषक जमिनींचे अकृषकसाठी प्रस्ताव सादर केले. कवडीमाेल दराने खरेदी केलेल्या शेती, भूखंडांची अवघ्या दाेन वर्षांच्या कालावधीतच वाढीव दराने विक्री केली. खुल्या भूखंड विक्रीत नफा कमी असल्याने काही नफेखाेर भूखंड माफियांनी मर्जीतील बांधकाम व्यावसायिकांच्या नावाने अत्यंत तकलादू बांधकाम करीत रहिवासी इमारती, ड्युप्लेक्सच्या माध्यमातून बक्कळ पैसा कमावला. यादरम्यान, चांदूर शिवारातील विद्रुपा व माेर्णा नदीकाठावर पूरप्रवण क्षेत्राची जाणीव असतानाही ड्युप्लेक्स, इमारती उभारून ग्राहकांची फसवणूक केली. ही सर्व फसवेगिरी २१ जुलैच्या मध्यरात्री आलेल्या पुरामुळे उघड झाली.

 

घरासाठी आयुष्यभराची कमाई खर्च

हक्काच्या घराचे स्वप्न रंगवित अनेकांनी आयुष्यभराची कमाई खर्च करीत गीता नगर, एमराॅल्ड काॅलनी, माताेश्री काॅलनी, अकाेली बु., चांदूर शिवार, गंगा नगर, काैलखेड, हिंगणा, खडकी येथील श्रध्दा काॅलनी, जाजू नगर, डाबकी रेल्वे गेट, न्यू तापडिया नगर आदी भागात ड्युप्लेक्स, सदनिकेची खरेदी केली. हा सर्व परिसर २१ जुलैच्या मध्यरात्री जलमय झाला हाेता.

 

नाल्यांचे बांधकाम केलेच नाही !

ले-आऊट धारकांनी कागदाेपत्री नाल्या दाखवल्या असल्या तरी प्रत्यक्षात नाल्यांच्या जागेवर प्लाॅटची आखणी केल्याचे अनेक प्रकार उजेडात आले आहेत. त्यामुळे पावसाचेच नव्हे तर बाराही महिने तुंबलेल्या सांडपाण्याचा निचरा हाेत नसल्याने रहिवाशांच्या आराेग्याची समस्या निर्माण झाली आहे.

 

असे घसरले खुल्या भूखंडांचे दर

                        २१ जुलै पूर्वी             नंतरचे दर

गीता नगर             ४००० रुपये प्रति फूट २२०० रुपये

एमराॅल्ड काॅलनी १८०० रुपये             ११०० रुपये

माताेश्री काॅलनी(अकाेली बु.)१५०० रु. ११०० रुपये

अकाेली बु. १००० रुपये             ६०० रुपये

चांदूर शिवार १५०० रुपये             ६०० रुपये

काैलखेड            २००० रुपये             १४०० रुपये

हिंगणा             १२०० रुपये             ८०० रुपये

खडकी(श्रध्दा काॅलनी) ८०० रुपये            ५०० रुपये

जाजू नगर            ६०० रुपये             ४०० रुपये

डाबकी रेल्वे गेट ४०० रुपये             २०० रुपये

 

काही बांधकाम व्यावसायिकांनी नदीच्या पूरप्रवण क्षेत्रात बांधकामे केली आहेत. ग्राहकांनी प्लाॅट, ड्युप्लेक्स किंवा सदनिका खरेदी करताना कागदपत्रे तपासण्याची गरज आहे. जेणेकरुन फसवणूक टाळता येईल.

- निमा अराेरा, आयुक्त मनपा

टॅग्स :Akolaअकोलाfloodपूर