शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

काटेपूर्णा नदीला पूर; शेकडो एकर शेतजमीन पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 17:22 IST

Katepurna River Flood : पुराचे पाणी शेतात शिरल्याने शेकडो एकर शेतीवरील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मूर्तिजापूर : काटेपूर्णा नदीला गुरुवारी सकाळी ८ वाजता आलेल्या अचानक पुरामुळे नदी काठावरील गावातील जनजीवन विस्कळीत झाले असून पुराचे पाणी शेतात शिरल्याने शेकडो एकर शेतीवरील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.       तालुका वगळता इतरत्र जोरदार झालेल्या अतिवृष्टीमुळे काटेपूर्णा नदीला आलेल्या अचानक पुरामुळे नदी तुडुंब भरून वाहत आहे. सदर पुराचे पाणी नदीकाठावरील शेतात शिरल्याने पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे परंतु तालुक्यातील नद्या मात्र दुथडी भरून वाहत आहेत तालुक्यातुन वाहत जात असलेल्या काटेपूर्णा व पुर्णा या दोन मोठ्या नद्या आहेत, दोन्ही नद्या दुथडी वाहत असून काटेपूर्णा नदीला गुरुवारी सकाळी अचानक पुर आला. तालुक्यात भरपूर पाऊस नझाल्याने नदी काठावरील गावातील नागरीक गाफील राहीले, परंतु सकाळी एकाएकी पुर आल्याने समशेरपूर, गोरेगाव, गाजीपुर, सालतवडा, अटकळी, जांभा, दताळा, भटोरी, शेलू बोंडे, मंगरुळ कांबे. आदी नदीकाठावरील गावातील शेत जमीन पाण्याखाली आल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर मूर्तिजापूर - म्हैसांग - अकोला मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. या नदीच्या विळख्यात येत असलेल्या काही गावाचा संपर्क तुटल्याची माहिती आहे. पुरामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

सकाळी आठवाजता काटेपूर्णा नदीला अचानक पुर आल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले, काही भागातील गावांचा संपर्क तुटला असून पुराचे पाणी शेतात शिरल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.-प्रवीण खोत, सरपंच समशेरपूर

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरAkolaअकोलाfloodपूर