अकोला: 'स्वच्छ महाराष्ट्र' अभियानांतर्गत महापालिका क्षेत्रात १0 हजार ७00 घरगुती शौचालये उभारण्याचे उद्दिष्ट आहे. प्रशासनाने पाच हजार शौचालय बांधणीचा टप्पा ओलांडला असून, सद्यस्थितीत साडेतीन हजार शौचालयाची बांधकामे प्रगती पथावर आहेत. पावसामुळे बांधकाम करताना विविध अडचणी निर्माण होत असल्याचे चित्र आहे.मनपा क्षेत्रात उघड्यावर शौचविधी करणार्या नागरिकांसाठी वैयक्तिक शौचालय उभारून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून महापालिका प्रशासनाला १५ कोटींचा निधी प्राप्त झाला. प्रशासनाने अशा नागरिकांचा शोध घेतला असता, १0 हजार ७00 नागरिकांक डे शौचालय नसल्याचे समोर आले. काही बहाद्दरांकडे शौचालय असले तरी सेप्टिक टॅँक नसल्यामुळे थेट नालीद्वारे मैला सोडल्या जात असल्याचे निदर्शनास आले. या प्रकारामुळे जीवघेण्या जीवजंतूंचे निर्माण होऊन नागरिकांना असाध्य रोगाचा सामना करावा लागण्याची चिन्हं आहेत. पात्र लाभार्थीला पहिल्या टप्प्यात सहा हजार रुपये, तर दुसर्या टप्प्यात ९ हजार रुपये अदा केले जात आहेत. प्रशासनाकडे ११ हजारांपेक्षा जास्त लाभार्थींचे अर्ज असून, सद्यस्थितीत यापैकी ५ हजार ३७ शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. उर्वरित लाभार्थींच्या खात्यात पहिल्या टप्प्यातील लाभार्थी हिस्सा जमा करण्यात आला असून, बांधकाम उभारण्याची कामे सुरू आहेत. यापैकी ३ हजार ५00 शौचालयांची कामे प्रगती पथावर असून, जुलैपर्यंत बांधकाम पूर्ण करण्याचे आयुक्त अजय लहाने यांचे निर्देश आहेत.
पाच हजार शौचालयांचा टप्पा ओलांडला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2016 01:21 IST