शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

दीड एकरात रोवले पाच विजेचे खांब

By admin | Updated: May 25, 2017 21:00 IST

वीज वितरणच्या कनिष्ठ अभियंता, कंत्राटदाराचा प्रताप

लोकमत न्यूज नेटवर्कबोरगाव मंजू : येथून जवळच असलेल्या कोळंबी येथील अल्पभूधारक शेतकऱ्याच्या दीड एकर शेतात वीज वितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंता व कंत्राटदाराने शेतकऱ्याची पूर्वपरवानगी न घेता पाच विजेचे पोल रोवून  समोरील शेतकऱ्यासाठी वीज नेली. ही लाइन नेत असता विजेचे खांब शेताच्या धुऱ्यावरून नेले असते तर शेतकऱ्याने मनाई केली नसती; परंतु दीड एकरात मधोमध पाच विद्युत पोल रोवल्यामुळे या शेतकऱ्याला शेती वहितीसाठी अडचण जात असून, शेतकऱ्याने नुकतीच या गंभीर प्रकाराची तक्रार जिल्हा अधिकारी यांना दिली आहे.प्रमोद महादेवराव उमाळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की वीज वितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंता आणि कंत्राटदाराने शेतीच्या मधोमध पाच खांब गाडले आहेत, त्यामुळे शेती मशागतीसाठी अडचणी येत आहेत. याप्रकरणी वीज वितरणसह इतर अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे; मात्र त्यावर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. सध्या खरीप हंगामासाठी मशागतीची कामे सुरू आहेत. या खांबांमुळे मशागतीसाठी अनेक अडचणी येत आहेत. शेती हेच कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन आहे; परंतु वीज वितरण व कंत्राटदाराच्या मनमानीमुळे या शेतकऱ्याला शेतीची मशागत करण्यासाठी अडथळा निर्माण झाला असून, शेती वहिती करणे कठीण झाले आहे. शेती पिकविली नाही, तर कुटुंबाचे पालनपोषण कसे करायचे, याची चिंता तक्रारकर्ता शेतकऱ्याला लागली आहे. आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची असूनसुद्धा हा शेतकरी मानसिकदृष्ट्या खचून गेला असून, या प्रकरणाची त्वरित दखल घेण्याची मागणी प्रमोद उमाळे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या तक्रारीत केली आहे.