शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीचे आमिष देऊन बेरोजगारास पाच लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 13:44 IST

सुशिक्षित बेरोजगार युवक शेखर नामदेव ठाकरे याची सुमारे पाच लाख रुपयांनी फसवणूक केल्याची तक्रार शेखर यांनी पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्याकडे केली आहे.

अकोला: बाळापूर तालुक्यातील कसुरा येथील दत्तराज महाराज विद्यालयात कर्मचारी असलेल्या राजू चव्हाण व चोपडे नामक दोघांनी लहान उमरीतील भगतसिंग चौकातील रहिवासी सुशिक्षित बेरोजगार युवक शेखर नामदेव ठाकरे याची सुमारे पाच लाख रुपयांनी फसवणूक केल्याची तक्रार शेखर यांनी पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्याकडे केली आहे.बाळापूर तालुक्यातील कसुरा येथील श्री दत्तराज महाराज विद्यालय शाळेवरील कर्मचारी राजू चव्हाण व चोपडे यांनी शेखर ठाकरे यास रेल्वेत टीसी या पदावर नोकरी लावून देण्याचे प्रलोभन दिले. तसेच यापूर्वी काही युवकांना नोकरीवर लावून दिल्याचेही या दोघांनी ठाकरे यांना सांगितले. दोन ते तीन युवकांची भेट घालून दिल्यानंतर शेखर ठाकरे यांना विश्वास बसला. त्यांनी या दोघांना पाच लाख रुपये दिले असून, या दोघांमधील चव्हाण नामक कर्मचाऱ्याने अनेक युवकांना फसविल्याचे तक्रारीत नमूद आहे. या फसवणूक प्रकरणातील चोपडे नामक व्यक्ती मुख्य सूत्रधार असल्याचे शेखर यांनी तक्रारीत नमूद केले आहे. शेखर ठाकरे यांनी घरातील दागदागिने विकून संजय निमकंडे आणि मधुकर आरेकर यांच्यासमक्ष सदर दोघांना पाच लाख रुपयांची रक्कम दिल्याचे त्यांचे म्हणणे आहे; मात्र नोकरी लावून न दिल्याने तसेच गत अनेक दिवसांपासून टाळाटाळ करीत असल्याने फसवणूक झाल्याचे ठाकरे यांच्या लक्षात आले. त्यांनी पैसे परत मागण्याचा तगादा लावला असता सदर दोघांनी ४ लाख ५० हजार रुपयांचा धनादेश दिला; मात्र खात्यात रक्कमच नसल्याने तो धनादेश परत आला. तेव्हा राजू चव्हाण याने ठाकरे यांची भेट घेऊन धनादेश लावू नका, अशी विनंती करीत रक्कम परत करण्याचे आश्वासन दिले; मात्र त्यानंतरही रक्कम परत मिळत नसल्याने शेखर ठाकरे यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दिली असून, सदर दोघांविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे. सदर दोन कर्मचाऱ्यांनी ठाकरे या युवकाची रेल्वेत टीसी लावून देण्याचे आमिष देऊन पाच लाख रुपयांनी फसवणूक केली. ही बाब सिद्ध झाली असून, दोन्ही कर्मचाºयांना ठाकरे यांची रक्कम परत करण्याच्या सूचना केल्या आहेत. रक्कम तातडीने परत न केल्यास विधिज्ञांचे मार्गदर्शन घेऊन दोघांवरही कारवाई करण्यात येणार आहे.- सेवकराम ताथोड, अध्यक्ष, श्री दत्तराज महाराज विद्यालय कसुरा.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी