शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल फ्रॉड, हे भाजपाला ८००,९०० जागाही देतील"; संजय राऊतांचा आरोप
2
चारशे पार सोडा, मोदी आणि एनडीएला २५० जागाही मिळणार नाहीत, या एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज 
3
मतदान आटोपताच बंगालमध्ये भाजपा कार्यकर्त्याची हत्या, हल्लीच केला होता भाजपात प्रवेश  
4
खळबळजनक! नांदेडमध्ये मशीन गनचे ३९१ राऊंड कालव्यात सापडले
5
साप्ताहिक राशीभविष्य : ७ राशींना धनलाभ होणार, शुभवार्ता समजणार; सुख-समृद्धीचा काळ!
6
"गौतम गंभीरनं टीम इंडियाच्या कोचपदासाठी अर्ज केला असेल तर...", गांगुलींचं रोखठोक मत
7
धक्कादायक! मद्यधुंद अवस्थेत रवीना टंडनने केली वृद्ध महिलेला मारहाण? मध्यरात्री नेमकं काय घडलं?
8
Exit Poll : कंगना राणौत की विक्रमादित्य सिंह... कोण मारणार बाजी?; जाणून घ्या, मंडीचा एक्झिट पोल
9
अमेरिकेकडून कॅनडाचा धुव्वा! ६ तारखेला USA vs PAK लढत; नेटकऱ्यांनी शेजाऱ्यांची उडवली खिल्ली
10
दोन राज्यांत मतमोजणी, अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाची मुसंडी, तर सिक्कीममध्ये SKM निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने 
11
'सुशांत नाही तर...', 'पवित्र रिश्ता'ला 15 वर्षे पुर्ण होताच अंकिता लोखंडे झाली भावूक
12
T20 WC, USA vs CAN: यजमानांचा दबदबा! १० सिक्स आणि ४ फोर; एकट्या 'जोन्स'ने कॅनडाला घाम फोडला
13
"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील"
14
सातवा टप्पाही पूर्ण; निकालाची प्रतीक्षा; ८,३६० उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद
15
'मी केदारनाथला गेल्यावर..'; सुशांतच्या बहिणीची भावूक पोस्ट, फोटो शेअर करत सांगितलं खास कनेक्शन
16
किती खरे आणि किती खोटे ठरले यापूर्वीचे ‘एक्झिट पाेल’?, मतदानानंतर सर्वांचे असते याकडे लक्ष
17
T20 WC 2024: ऑस्ट्रेलिया नाही! पण भारत फायनल खेळणार; 'युवी'ने सांगितला खेळ भावनांचा
18
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
19
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
20
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा

शिक्षक कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षासह पाच संचालक बडतर्फ; महापालिका आयुक्तांची कारवाई

By आशीष गावंडे | Published: September 21, 2022 3:19 PM

महापालिका कर्मचाऱ्यांनी स्थापन केलेल्या शिक्षक समृध्दी पतसंस्थेमध्ये गैरव्यवहार केल्याप्रकरणी मनपा आयुक्त कविता द्विवेदी यांनी बुधवारी पतसंस्थेचे अध्यक्ष नरेश बाबुलाल मूर्ती यांच्यासह पाच संचालकांना मनपाच्या सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई केली आहे. 

महापालिका कर्मचाऱ्यांनी स्थापन केलेल्या शिक्षक समृध्दी पतसंस्थेमध्ये गैरव्यवहार केल्याप्रकरणी मनपा आयुक्त कविता द्विवेदी यांनी बुधवारी पतसंस्थेचे अध्यक्ष नरेश बाबुलाल मूर्ती यांच्यासह पाच संचालकांना मनपाच्या सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई केली आहे. 

महापालिकेच्या शिक्षक समृद्धि कर्मचारी पतसंस्थेत २०१२ ते २०१७ या कालावधीत अतिरिक्त भाग भांडवल, अनामत रक्कम काढणे, खोट्या नोटीसद्वारे रक्कम काढणे, खर्चाची देयके नसताना रक्कम अदा करणे, बोगस सभासद दाखवून रक्कम अदा करणे यासह लाखो रुपयांच्या आर्थिक व्यवहाराची कागदपत्रे गहाळ केली जात असल्याची तक्रार जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे प्राप्त झाली होती. प्राप्त तक्रारीवरून जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे लेखापरीक्षक विनायक तायडे यांनी लेखापरीक्षणात गैरव्यवहार झाल्याचा अहवाल तालुका उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे सादर केला होता. याप्रकरणी तत्कालीन जिल्हा उपनिबंधकांनी रामदास पेठ पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी पतसंस्थेच्या अध्यक्ष, व्यवस्थापकासह दहा संचालकांविरुद्ध फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. 

या पाच जणांवर केली कारवाईपतसंस्थेच्या माध्यमातून अध्यक्ष, व्यवस्थापक व संचालकांनी २३ लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे अहवालात नमूद आहे.  त्याअनुषंगाने मनपा प्रशासनाने पतसंस्थेचा अध्यक्ष तथा मनपा शिक्षक नरेश बाबुलाल मूर्ती, पतसंस्थेचे सदस्य तथा संचालक लेखा विभागातील सुनिता चारकोलू, सोनटक्के, अग्नीशमन विभागातील प्रकाश फुलंबरकर, शिक्षक शरद टाले यांच्यावर बडतर्फीची कारवाइ करण्यात आली. 

मनपा कर्मचारी कारवाईच्या फेऱ्यातपतसंस्थेमध्ये सहभागी असणाऱ्या सदस्य व संचालकांमध्ये मनपा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यामुळे टप्प्याटप्प्याने संबंधित कर्मचाऱ्यांवर देखील कारवाई केली जाण्याची दाट शक्यता आहे. प्रशासनाच्या कारवाईमुळे संबंधितांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.

टॅग्स :Akolaअकोला