शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह पुणे दौरा: झाडाझडतीत तरुणाकडे मिळाले पिस्तुल, पोलिसांनी केले जप्त
2
महाराष्ट्रात रजिस्ट्रेशन, चालवली बंगळुरूत; फरारीच्या मालकाला भरावा लागला १.४२ कोटींचा टॅक्स; प्रकरण काय?
3
Pune Accident Video: कार थांबली, ते जवळ गेले अन् पाठीमागून...; काळजाचा ठोका चुकवणारा अपघात
4
Trump Putin Call: '...तोपर्यंत युद्ध थांबवणार नाही'; व्लादिमीर पुतीन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना ठणकावलं
5
BJP New President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष महिला? निर्मला सितारामन यांच्यासह 'ही' ३ नावे चर्चेत!
6
Post Office च्या PPF स्कीममध्ये महिन्याला ₹२००० जमा कराल तर १५ वर्षांनंतर किती रक्कम मिळेल, पैसेही राहतील सुरक्षित
7
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
8
शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर पती पराग त्यागीची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट, म्हणाला- "आजूबाजूच्या अफवांमध्ये.."
9
"गरीब हिंदूंना कशाला मारताय? हिंमत असेल तर नळबाजार, मोहम्मद अली रोड येथे जाऊन…’’, नितेश राणेंनी दिलं आव्हान 
10
"एअर इंडियाने कोलंबोला जातोय, इच्छापत्र बनवून ठेवलंय...", प्रसिद्ध अभिनेत्याने शेअर केला Video
11
Today Daily Horoscope: कोणत्या राशीला आज धनलाभाचा योग? जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
12
‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ विजेत्या गावांना प्रत्येकी २५ लाख; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची घोषणा
13
पदवी आहे, पण काम भलतेच! नोकरीचे वास्तव; पीरियॉडिक लेबर फोर्स सर्व्हेमधून समोर
14
रायकर पाड्यातील विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्यासाठी जीवघेणा प्रवास; वैतरणा नदी तराफ्यावरून करावी लागते पार
15
पुणे हादरले : घरात घुसून तरुणीवर बलात्कार, तिच्याच मोबाइलवर काढले फोटो ; संगणक अभियंता तरुणी राहात होती उच्चभ्रू सोसायटीत
16
उद्धव-राज : जुन्या जखमांचा हिशेब कसा होणार?
17
यूपीतील शेतकऱ्यांच्या नावे नांदेडमध्ये पीक विमा; ४० सुविधा केंद्र चालकांवर गुन्हा; त्यात ९ जण परळीचे
18
दलाई लामांना ड्रॅगन-विळखा
19
कार चालकाची चूक असल्यास भरपाई मिळणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने दिले निर्देश
20
लंडनची डॉक्टर मैत्रीण पोलिसांच्या रडारवर; दादरमधील अत्याचार प्रकरणातील शिक्षिकेच्या वैद्यकीय चाचण्या पूर्ण; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

अकोला जिल्ह्यात गुरुवारी पाच मृत्यू, २५८ कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 19:19 IST

Corona Cases in Akola : पाज जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृत्युमुखी पडणाऱ्यांची एकूण संख्या ४५८ झाली आहे.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, गुरुवार, १ एप्रिल रोजी आणखी पाज जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृत्युमुखी पडणाऱ्यांची एकूण संख्या ४५८ झाली आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १७०, तर रॅपिड अँटिजेन चाचण्यांमध्ये ८८ अशा एकूण २५८ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाल्याने एकूण बाधितांचा आकडा २७,९५८ वर पोहोचला आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून गुरुवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १२७९ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १७० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ११०९ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये अकोट येथील २४, पातूर येथील नऊ, मोठी उमरी येथील सहा, अडगाव, तेल्हारा व जठारपेठ येथील प्रत्येकी पाच, बार्शीटाकळी, गोरक्षणरोड व एमआयडीसी येथील प्रत्येकी चार, अडगाव खु., कौलखेड, मलकापूर, गंगा नगर, सुधीर कॉलनी, वणीरंभापूर, रतनलाल प्लॉट व उमरी नाका येथील प्रत्येकी तीन, रुईखेड, हिवरखेड, बायपास रोड, डाबकी रोड, पारस, लहान उमरी, सिंधीकॅम्प, भिकूनखेड व बाळापूर येथील प्रत्येकी दोन, उन्नती खुर्द, विवरा, बेलुरा, कुटासा, आसेगाव बाजार, ऐदलापूर, नव्हेरी खुर्द ता.अकोट, चिंतलवाडी, गाडेगाव, हिंगणी बु., महागाव बु., खरप रोड, विजयनगर, पोलिस लाईन, जीएमसी, ताजनगर, आळशी प्लॉट, आदर्श कॉलनी, आपातापा रोड, राधाकिसन प्लॉट, नया अंदुरा, उरळ बु., शंकर नगर, खापरखेडा, चैतन्यवाडी, पोलीस हेडक्वॉटर, यावलकरवाडी, खदान, निपाणा, रिधोरा, अंदाज सावगी, खैर मोहमद प्लॉट, भौरद, लोणी, खोलेश्वर, गाडगे नगर, गड्डम प्लॉट, अनिकट, गीता नगर, कंळबेश्वर व समता नगर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

सायंकाळी जीएमसी येथील चार, बाळापूर व तेल्हारा येथील प्रत्येकी दोन, शिवर, एमआयडीसी, दुर्गा चौक, रेणूका नगर, गुलजार घाट, घुसर, आपातापा, गुन्हे अन्वेषक विभाग, सस्ती वाडेगाव, विजय नगर, रामदासपेठ, खडकी व शिवनी येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

 

एक महिला, चार पुरुष दगावले

कोरोनावर उपचार सुरु असलेल्या मुंडगाव, ता.अकोट येथील ८६ वर्षीय महिला, डाबकी रोड, अकोला येथील ७१ वर्षीय पुरुष, तारफैल, अकोला येथील ६४ वर्षीय पुरुष, शिवापूर अकोला येथील ५० वर्षीय पुरुष गोरक्षण रोड, अकोला येथील ८३ वर्षीय पुरुष अशा पाच जणांचा गुरुवारी मृत्यू झाला.

 

६९८ जणांना डिस्चार्ज

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३३, युनिक हॉस्पीटल येथील सात, हॉटेल रिजेन्सी येथील चार, नवजीवन हॉस्पीटल येथील चार, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील दोन, बिहाडे हॉस्पीटल येथील सात, आयकॉन हॉस्पीटल येथील दोन, हारमोनी हॉस्पीटल येथील दोन, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील पाच, आर्युवेदिक महाविद्यालयातून दोन, कोविड केअर सेंटर अकोट येथील चार, इंद्रा हॉस्पीटल येथील तीन, हॉटेल स्कायलार्क येथील तीन, तर होम आयसोलेशन येथील ६२० अशा एकूण ६९८ जणांना गुरुवारी डिस्चार्ज देण्यात आला.

५,३३९ ॲक्टिव्ह रुग्ण

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २७,९५८ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल २२,१६१ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ४५४ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ५,३३९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या