शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शास्ती अभय याेजनेसाठी पाच दिवसांची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:20 IST

थकीत टॅक्स; वसंत टाॅकीज सील अकाेला : मालमत्ताधारक राधाकिशन तोष्‍णीवाल यांच्याकडे सन २०१९ ते सन २०२१ पर्यंत ३ लाख ...

थकीत टॅक्स; वसंत टाॅकीज सील

अकाेला : मालमत्ताधारक राधाकिशन तोष्‍णीवाल यांच्याकडे सन २०१९ ते सन २०२१ पर्यंत ३ लाख रुपये मालमत्ता कर थकीत असल्याने साेमवारी वसंत टाॅकीजला सील लावण्यात आले. यांसह सुशील कुमार खोवाल यांच्याकडे सन २०१७ ते सन २०२१ पर्यंत ३ लाख ८५ हजार व नरेश अग्रवाल यांच्याकडे २०१७ ते सन २०२१ पर्यंत १० लाख रुपये टॅक्स थकीत असल्याने त्यांच्या मालमत्तेला सील लावण्यात आले.

‘प्रभागातील समस्या निकाली काढा!’

अकाेला : महापालिका क्षेत्रात समाविष्ट झालेल्या प्रभाग क्रमांक १ मधील रहिवाशांना मूलभूत साेयी-सुविधांअभावी नरकयातना भाेगाव्या लागत आहेत. प्रभागात रस्ते, नाल्या, पथदिव्यांची सुविधा नाही. पाणीपुरवठ्याची याेजना अर्धवट आहे. नागरिक वैतागले असून प्रभागातील समस्या निकाली काढण्याची मागणी काॅंग्रेसचे महासचिव ईस्माईल हबीब टीव्हीवाले यांच्यासह असंख्य नागरिकांनी जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त निमा अराेरा यांच्याकडे केली.

किराणा बाजारात उप डाकघर सेवारत

अकाेला : शहरातील मिनी बायपास परिसरातील नवीन किराणा बाजारात हाेलसेल किराणा मार्केट उप डाकघर कार्यान्वित करण्यात आले. यावेळी डाकघरचे प्रवर अधीक्षक बी. कृष्णा, किराणा बाजारचे सचिव कासमअली नानजीभाई, काेषाध्यक्ष चंचल भाटी, कार्यकारिणी सदस्य ज्ञानप्रकाश खंडेलवाल, महेंद्रकुमार कांतिलाल, तुषार भिमजीयानी उपस्थित हाेते.

पुरामुळे पाेषण आहार, पुस्तकांचे नुकसान

अकाेला : शहरात २१ जुलैच्या मध्यरात्री आलेल्या पुराचे पाणी घरांत, बाजारात व शाळांमध्ये शिरल्याने वित्तहानी झाली. शहरालगतच्या भाैरद येथील माध्यमिक विद्यालयात पुराच्या पाण्यामुळे खाेल्यांमधील शालेय पाेषण आहार, पुस्तके, फ्रीज, संगणक आदी विविध साहित्याचे माेठे नुकसान झाले आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी शिक्षकांनी केली आहे.

‘भगतवाडीमध्ये खडीकरण करा’

अकाेला : जुने शहरातील प्रभाग क्रमांक ९ अंतर्गत येणाऱ्या भगतवाडी, भगिरथवाडी आदी भागात नागरिकांना धड चालण्यासाठी रस्ते उपलब्ध नाहीत. पावसामुळे सर्वत्र चिखल साचला असून साचलेल्या पाण्यातून वाट काढताना महिला, वयाेवृध्द नागरिक व लहान मुलांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे रस्त्यांचे खडीकरण करण्याची मागणी युवा स्वाभिमान पार्टीच्यावतीने मनपा आयुक्तांकडे करण्यात आली आहे.