शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

तीन आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2017 02:47 IST

बोरगाव मंजू : अकोला येथील एका ४० वर्षीय इसमाची आपातापानजीक बंधु गोट्याजवळ हत्या केल्याची बाब ८ मे रोजी उघडकीस आली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कबोरगाव मंजू : अकोला येथील एका ४० वर्षीय इसमाची आपातापानजीक बंधु गोट्याजवळ हत्या केल्याची बाब ८ मे रोजी उघडकीस आली होती. बोरगाव मंजू पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेतला. सदर खूनप्रकरणी अखेर सोमवारी पोलिसांनी तीन जणांना जेरबंद करून आज मंगळवारी, १६ मे रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २० मे पर्यंत पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.आपातापानजिक बंधु गोट्याजवळ एका ४० वर्षीय इसमाचा खून करण्यात आल्याचे पोलीस तपासादरम्यान निष्पन्न झाले होते. सदर प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून दरम्यान सदर मृत हा जगतसिंग रतीरामसिंग कुशवाह रा. खोलेश्वर, अकोला असल्याची ओळख पटवली होती. सदर खूनप्रकरणी मृताची पत्नी गुड्डन जगतसिंग कुशवाह हिला संशयित म्हणून ठाणेदार पी. के. काटकर यांनी घटनेच्या दिवशी ताब्यात घेतले होते. पुढील तपासादरम्यान कल्लु ऊर्फ सुनील कुशवाह, धर्मेंद्र रामप्रसाद कुशवाह यांना पोलिसांनी मूळगाव कानीज उत्तर प्रदेश येथून ताब्यात घेतले. १५ मे रोजी गुड्डन कुशवाह, धर्मेंद्र कुशवाह, कल्लु ऊर्फ सुनील कुशवाह या तिघांवरही भादंवि ३०२, १२० ब ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. त्यांना १६ मे रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २० मे पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली असून, पुढील तपास ठाणेदार पी. के. काटकर करीत आहेत.