शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमदार माजलेत असं बाहेर म्हटलं जातंय, राजकारणाच्या पलीकडे जाणार की नाही?"; CM फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
2
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
3
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
4
विदेशी सट्टेबाजांचा वायदे बाजारावर डाव, छोट्या गुंतवणूकदारांनो सजगतेनं करा बचाव!
5
विधिमंडळ परिसरात धक्काबुक्की प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला, दोषींवर होणार अशी कारवाई 
6
शाहरुख खानच्या मेकअप रुमबाहेर काढला फोटो, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद
7
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान
8
रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीन मार्केटमध्ये रिलायन्सची एन्ट्री, १०० वर्ष जुनी अमेरिकन कंपनी केली खरेदी
9
सोन्याची झळाळी कमी होणार, चांदीची चमक मात्र वाढणार; १३ टक्क्यांच्या तेजीचा अंदाज, किती जाऊ शकतो भाव?
10
मोहम्मद शमीची एक्स पत्नी हसीन जहां आणि मुलीवर हत्येच्या प्रयत्नाचा आरोप, गुन्हा दाखल; भांडणाचा व्हिडिओ व्हायरल
11
Narendra Modi : "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल
12
IND vs ENG : लॉर्ड्सच्या मैदानातील पराभवानंतर या दिग्गजांनी काढली जड्डूची चूक; आता गंभीर म्हणाला...
13
जगातला एकमेव अनोखा देश, 'या' देशाला राजधानीच नाही! तुम्हाला माहितीये का?
14
गुहेत सापडलेल्या रशियन महिलेबाबत मोठी माहिती आली समोर; इस्त्रायलच्या पार्टनरने केली वेगळीच मागणी
15
महाराष्ट्रातील गणेशोत्सव राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवणार, आशिष शेलार यांची घोषणा
16
मित्र-नातेवाईकांसाठी 'जामीनदार' बनताय? 'ही' काळजी घेतली नाही तर बँक दारातही उभं करणार नाही
17
मोठी बातमी! सांगलीतील 'इस्लामपूर' शहराचे नाव बदलणार; भुजबळांची विधानसभेत घोषणा
18
स्टायलिश लूकसह जबरदस्त फीचर्स! टीव्हीएसची स्पोर्ट्स बाईक अपाचे आरटीआर ३१० भारतात लॉन्च
19
सीईओंना कोट्यवधी रुपयाचं पॅकेज तर इंटर्नला ५०० रुपयांचं ॲमेझॉन व्हाउचर! तरुणाच्या पोस्टने खळबळ

पाच महामंडळांच्या कर्जासाठी ठोक हमी

By admin | Updated: December 8, 2014 23:49 IST

प्रलंबित कर्ज प्रकरणांचा मार्ग मोकळा!

संतोष येलकर/अकोलासामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्यातील पाच महामंडळांना राष्ट्रीय महामंडळांकडून कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी ठोक हमी देण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला. त्यामुळे महामंडळांकडे प्रलंबित असलेल्या मागासवर्गीय लाभार्थ्यांच्या कर्ज प्रकरणांचा मार्ग आता मोकळा झाला आहे.शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राज्यातील अनुसूचित जाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्गातील व्यक्तींची रोजगाराच्या माध्यमातून उन्नती व्हावी, यासाठी राज्य शासनाच्या नियंत्रणाखाली कार्यरत पाच महामंडळामार्फत विविध योजना राबविल्या जातात. त्यामध्ये महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वित्त व विकास महामंडळ इत्यादी महामंडळांचा समावेश आहे. या महामंडळांमार्फत राज्य व राष्ट्रीय महामंडळाच्या योजना राबविल्या जातात. राज्यातील महामंडळांना राष्ट्रीय महामंडळांकडून कर्ज स्वरुपात निधी उपलब्ध करुन दिला जातो; मात्र राज्यातील पाचही महामंडळांना देण्यात आलेल्या कर्ज हमीचा कालावधी संपुष्टात आल्याने, राष्ट्रीय महामंडळांकडून राज्यातील महामंडळांना कर्ज स्वरुपात निधी देणे बंद करण्यात आले. राष्ट्रीय महामंडळांकडून निधी उपलब्ध झाला नसल्याने, राज्यातील महामंडळांकडे मोठय़ा प्रमाणात कर्ज प्रकरणे प्रलंबित आहेत. कर्ज प्रकरणे प्रलंबित असल्याने,लाभार्थ्यांंमध्ये असंतोष असून त्या पृष्ठभूमीवर पाचही महामंडळांना राष्ट्रीय महामंडळांकडून कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी २५७.९२ कोटी रुपयांची ठोक हमी देण्याचा निर्णय राज्य शासनामार्फत ६ डिसेंबर रोजी घेण्यात आला. शासनाकडून हमी देण्यात आली असल्याने, राष्ट्रीय महामंडळांकडून राज्यातील महामंडळांना कर्ज स्वरुपात निधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे राज्यातील महामंडळांकडे प्रलंबित असलेली लाभार्थ्यांंची कर्ज प्रकरणे मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.महामंडळांसाठी शासनाकडून देण्यात आलेली कर्ज हमी!महामंडळ                                                            रक्कम (कोटी) महात्मा फुले मागसवर्ग विकास महामंडळ                                  ६0.५२ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ                             0७.0५ संत रोहिदास चर्मोद्योग/ चर्मकार विकास महामंडळ                      ३१.१५ वसंतराव नाईक विमुक्त जाती/भटक्या जमाती विकासमहामंडळ      २८.२0 महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग व विकास महामंडळ                        ७0.५0 .............................................                                                                  एकूण                     २५७.९२*कर्ज उचलण्याची मुदत एक वर्ष! शासनामार्फत देण्यात आलेल्या हमीवरील २५७ कोटी ९२ लाख रुपयांचे कर्ज उचलण्याची मुदत एक वर्षापर्यंंत वैध राहणार आहे. या कालावधीत महामंडळांना दिलेल्या हमी रक्कमेच्या र्मयादेतच कर्जाची उचल करावी लागणार आहे.