शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

अर्भक नालीत फेकणाऱ्या कुमारी मातेसह पाच ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 14:17 IST

अकोला: केळीवेळी येथील एका नाल्यात सहा महिन्यांच्या स्त्री जातीचे अर्भक फेकणाºया कुमारी मातेसह तिचा प्रियकर व आई-वडिलांसह एका डॉक्टरला स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी सायंकाळी ताब्यात घेतले.

अकोला: केळीवेळी येथील एका नाल्यात सहा महिन्यांच्या स्त्री जातीचे अर्भक फेकणाºया कुमारी मातेसह तिचा प्रियकर व आई-वडिलांसह एका डॉक्टरला स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी सायंकाळी ताब्यात घेतले. या आरोपींना दहीहंडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.केळवेळी येथील रहिवासी अनिल दिनकर आडे यांच्या घराशेजारी असलेल्या एका नाल्यात ३० एप्रिल रोजी सहा महिन्यांच्या नवजात स्त्री जातीचे अर्भक बेवारस स्थितीत आढळून आले होते. या प्रकरणाची माहिती आडे यांनी दहीहंडा पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने सुरू केला असता हे स्त्री जातीचे अर्भक याच गावातील रहिवासी असलेल्या एका कुमारी मातेचे असल्याचे समोर आले. समाजात बदनामी होऊ नये या भीतीपोटी सदर कुमारी माता व तिच्या आईने या स्त्री जातीचे अर्भक विल्हेवाट लावण्यासाठी नालीत टाकले होते. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने सदर कुमारी मातेला विश्वासात घेतल्यानंतर तिने याच गावातील रहिवासी असलेला शेख कलीम शेख जलील २७ याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती दिली. या प्रेमसंबंधातूनच तिला गर्भधारणा झाली आणि यामध्येच ती सहा महिन्यांची गर्भवती राहिली; मात्र समाजात बदनामी होण्याच्या भीतीने तिने प्रियकराच्या मदतीने गर्भपाताच्या गोळ्या घेऊन तिचा गर्भपात केला. या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर सदर गर्भपात करण्यासाठी डॉक्टर बलराम मंडल, मुलीचे आई-वडील यांनी सहकार्य केल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी या आरोपींना ताब्यात घेऊन दहीहंडा पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली छाया वाघ, दिनकर बुंदे, संदीप काटकर, भावलाल हेंबाडे भाग्यश्री मेसरे यांनी केली.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी