शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

मत्स्य बीज संचयन कागदावरच; क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 17:49 IST

अकोला : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांचे जाळे विणण्यात आले आहे. हे वर्ष सोडले तर दरवर्षी मोठ्या प्रमाणात मत्स्य व्यवसाय चालतो. पण, मत्स्य बीज संचयनाची अधिकृत माहितीच उपलब्ध नसल्याने एखाद्या संस्थेने किती मत्स्य बीज संचयन केले, याची अधिकृत माहितीच उपलब्ध नसल्याचे वृत्त आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात एक मोठे व चार मध्यम सिंचन प्रकल्प असून, लघू प्रकल्पांची संख्या मोठी आहे.मत्स्य बीज सोडले जाते किंवा संचयन केले जाते याची आकडेवारी असणे गरजेचे आहे. ही जबाबदारी सहायक आयुक्त मत्स्य विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांची आहे.

अकोला : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांचे जाळे विणण्यात आले आहे. हे वर्ष सोडले तर दरवर्षी मोठ्या प्रमाणात मत्स्य व्यवसाय चालतो. पण, मत्स्य बीज संचयनाची अधिकृत माहितीच उपलब्ध नसल्याने एखाद्या संस्थेने किती मत्स्य बीज संचयन केले, याची अधिकृत माहितीच उपलब्ध नसल्याचे वृत्त आहे. याकडे मत्स्य आयुक्त क्षेत्रीय अधिकाऱ्यां चे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.जिल्ह्यात एक मोठे व चार मध्यम सिंचन प्रकल्प असून, लघू प्रकल्पांची संख्या मोठी आहे. तसेच अनेक जण शेततळ््यात मत्स्य संगोपन करतात. त्यासाठी मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांची स्थापना करण्यात आली आहे. यावर्षी पाऊस कमी असल्याने लघू व इतर छोट्या प्रकल्पात पाणी नाही. त्यामुळे मत्स्य व्यवसाय थोडा मंदावला असला, तरी मोेठ्या प्रकल्पात काही प्रमाणात मासेमारी सुरू आहे. पण, ज्या तळ््यात मत्स्य बीज सोडले जाते किंवा संचयन केले जाते याची आकडेवारी असणे गरजेचे आहे. ही जबाबदारी सहायक आयुक्त मत्स्य विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांची आहे. मत्स्य बीज ज्यावेळी सोडले जाते त्यावेळी त्याची नोंद घ्यावी लागते. जेवढे मत्स्य बीज सोडायचे सांगितले तेवढे सोडले की नाही, हे बघावे लागते. पण, याचा ताळेबंदच नसल्याचे वृत्त आहे.दरम्यान, मत्स्य बीज संचयन केल्याच्या पुराव्यासाठी नियमाप्रमाणे मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था अध्यक्ष, गावचा सरपंच किंवा पोलीस पाटील यांची सही घेतली जात आहे. याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

मत्स्य बीज संचयनयच्या वेळी मत्स्य आयुक्त क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीची गरज असते. तेव्हाच किती मत्स्य बीज पाण्यात सोडण्यात आले, याची माहिती मिळेल; पण तसे होत नाही. मत्स्य व्यवसायला चालना देऊन संस्थांचे बळकटीकरण व आर्थिकदृष्ट्या सक्षम करायच्या असतील, तर याकडे लक्ष देण्याची गरज आहे.- प्रकाश पाटील, प्राधिकृत अधिकारी,वसंत मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था मर्यादित.धानोरा (पाटेकर), ता. मूर्तिजापूर, जिल्हा अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola cityअकोला शहर