शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अकोला येथे पहिले विदर्भस्तरीय महिला अधिवेशन उत्साहात

By admin | Updated: December 16, 2014 00:59 IST

महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचा उपक्रम.

अकोला : महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या (फेस्कॉम) वतीने प्रथमच अकोल्यात आयोजित करण्यात आलेले विदर्भस्तरीय महिला अधिवेशन सोमवार, १५ डिसेंबर रोजी रामदासपेठेतील टिळक पार्कमध्ये उत्साहात पार पडले. या अधिवेशनात ज्येष्ठ महिलांना उद्भवणार्‍या विविध समस्या आणि त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या प्रगतीच्या विविध दिशांवर विचारमंथन करण्यात आले.दोन सत्रांमध्ये पार पडलेल्या विदर्भस्तरीय अधिवेशनाचा उद्घाटन सोहळा सकाळी १0 वाजता झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या अध्यक्ष डॉ. अलका व्यास, डॉ. आशा मिरगे, डॉ. दीपाली शुक्ल उपस्थित होत्या. अधिवेशनात अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलडाणा या जिलंतील २२५ ज्येष्ठ महिला सहभागी झाल्या होत्या. पहिल्या सत्राच्या अध्यक्षस्थानी शकुन परांजपे होत्या. डॉ. आशा मिरगे, डॉ. दीपाली शुक्ल व डॉ. अलका व्यास यांनी मनोगत व्यक्त केले. ज्येष्ठ महिलांना उद्भवणार्‍या विविध समस्यांवर यावेळी विचारमंथन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन झाले. संचालन डॉ. स्मिता कायंदे व प्रास्ताविक पूनम पिंपरकर यांनी केले. दुसर्‍या सत्राच्या अध्यक्षस्थानी मंगला देशमुख होत्या. या सत्रात विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि निबंध स्पर्धा पार पडली तसेच कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेत ज्येष्ठ महिलांसाठी प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम घेण्यात आला. यानंतर उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार व पारितोषिके वितरित करण्यात आली. संचालन संध्या संगवई यांनी केले. आभार शुभांगी कुळकर्णी यांनी मानले. कार्यक्रमाला आयस्कॉनचे उपाध्यक्ष ना. ना. इंगे, विदर्भ पश्‍चिम विभागाचे अध्यक्ष मधुसूदन कुळकर्णी, उपाध्यक्ष परशराम जाधव, सचिव विनायक पांडे, समन्वय समितीचे अध्यक्ष अरविंद मोडक, कोशाध्यक्ष दिनकर चिपळूणकर, सचिव मु. ज. निर्वाण, प्रकाश पिंपरकर, सविता गौतम, मंगला देशमुख, शुद्धमती इंगळे, कलावती तळेकर आदी उपस्थित होते.