शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

पहिले राज्यस्तरीय होमिओपॅथी सचित्र प्रदर्शन अकोल्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 13:19 IST

अकोला : जागतिक होमिओपॅथी दिनानिमित्त सर्वसामान्य रुग्णांना या उपचार पद्धतीची ओळख होऊन भारतीय जीवन व्यापून टाकलेल्या पॅथीला समजून घेण्यासाठी पहिले राज्यस्तरीय होमिओपॅथी सचित्र प्रदर्शन रविवार, १५ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आल्याची माहिती डॉ. सितल टोंगसे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्दे रविवारी सकाळी ९.३० वाजता पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार. अद्ययावत चिकित्सा प्रणालीची ओळख व्हावी म्हणून ओळख होमिओपॅथीची या नावाने प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे.होमिओपॅथीमुळे फक्त शरीरच नाही, तर रुग्णांचे मन आणि विचारसुद्धा निरोगी होतात.

अकोला : जागतिक होमिओपॅथी दिनानिमित्त सर्वसामान्य रुग्णांना या उपचार पद्धतीची ओळख होऊन भारतीय जीवन व्यापून टाकलेल्या पॅथीला समजून घेण्यासाठी पहिले राज्यस्तरीय होमिओपॅथी सचित्र प्रदर्शन रविवार, १५ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आल्याची माहिती डॉ. सितल टोंगसे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.होमिओपॅथी ही जगातील सर्वात अद्ययावत व प्रगत तंत्रज्ञान असलेली वैद्यकीय चिकित्सा प्रणाली आहे. होमिओपॅथीचा अनेक देशांमध्ये उपयोग केल्या जात आहे. जगात ५० कोटींवर लोकांना या पॅथीचा लाभ झालेला आहे. होमिओपॅथीमुळे फक्त शरीरच नाही, तर रुग्णांचे मन आणि विचारसुद्धा निरोगी होतात. कॅन्सर, मधुमेह, थायरॉइड, किडनीचे आजार आदींवर होमिओपॅथी परिणामकारक आहे. अकोल्यातही या अद्ययावत चिकित्सा प्रणालीची ओळख व्हावी म्हणून ओळख होमिओपॅथीची या नावाने प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे. हे सचित्र प्रदर्शन महाराष्ट्रात पहिल्यांदाच आयोजित केले असल्याचे डॉ. टोंगसे यांनी सांगितले.प्रदर्शनाचे रविवारी सकाळी ९.३० वाजता पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून, यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महापौर विजय अग्रवाल, नगरसेविका सुनीता अग्रवाल, नगरसेवक, आशिष पवित्रकार उपस्थित राहणार आहेत. जागतिक कीर्तीचे होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. बंदिश अंबानी (मुंबई) हे प्रमुख वक्ते, तर मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. किशोर मालोकार, प्राचार्य डॉ. संजय तिवारी प्रभात किड्स स्कूलचे प्रमुख डॉ. गजानन नारे, सन्मित्र पब्लिक स्कूलचे अध्यक्ष प्रदीप राजपूत यांच्या विशेष उपस्थितीत या प्रदर्शनाचे उद्घाटन राम नगर येथे होत असल्याचे टोंगसे यांनी सांगितले. याच दिवशी होमिओपॅथी उपचार शिबिरदेखील आयोजित करण्यात आले असून, या शिबिरात डॉ. सूचिता जायभाये, डॉ. प्रभाकर जायभाये, डॉ. उदय ताकवाले, डॉ. प्रवीण इंगळे, डॉ. संजीवनी टोंगसे, डॉ. प्रभाकर वाकडे, डॉ. आदित्य नानोटे, डॉ. सत्यजित कुचर आणि मुंबईचे डॉ. बंदिश अंबानी तपासणी करून उपचार करणार आहेत. यानिमित्ताने शहरातील सुमारे २०० रिक्षाचालकांचा सन्मान केला जाणार असल्याचेही टोंगसे यांनी सांगितले. पत्रपरिषदेला, डॉ. संजीवनी टोंगसे, डॉ. प्रभाकर जायभाये, डॉ. सूचिता जायभाये, डॉ. आदित्य नानोटी, डॉ. उदय ताकवाले, डॉ. प्रवीण इंगळे उपस्थित होते.

टॅग्स :AkolaअकोलाAkola cityअकोला शहर