शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आधी रस्ते दुरुस्ती, त्यानंतर जलवाहिनीचे जाळे टाका - जितेंद्र वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 01:45 IST

अकोला: शहरात मुख्य रस्त्यांलगत खोदकाम करून जलवाहिनीचे जाळे टाकल्या जात असले तरी रस्त्यांच्या दुरुस्तीला विलंब होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आतापर्यंत खोदकाम केलेल्या रस्त्यांची आधी दुरुस्ती करा, त्यानंतरच टप्प्याटप्प्याने जलवाहिनीचे जाळे टाकण्याचे निर्देश महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी कंत्राटदाराला दिले. 

ठळक मुद्देआयुक्त जितेंद्र वाघ यांचे कंत्राटदाराला निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शहरात मुख्य रस्त्यांलगत खोदकाम करून जलवाहिनीचे जाळे टाकल्या जात असले तरी रस्त्यांच्या दुरुस्तीला विलंब होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आतापर्यंत खोदकाम केलेल्या रस्त्यांची आधी दुरुस्ती करा, त्यानंतरच टप्प्याटप्प्याने जलवाहिनीचे जाळे टाकण्याचे निर्देश महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी कंत्राटदाराला दिले. केंद्र व राज्य शासनाच्या ‘अमृत’योजनेच्या माध्यमातून भूमिगत गटार योजना व संपूर्ण शहराची जलवाहिनी बदलण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. या दोन्ही कामांवर देखरेख ठेवण्यासाठी शासनाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला तांत्रिक सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे. या दोन्ही योजनांचा आवाका पाहता त्यावर देखरेख ठेवणाºया मजीप्राची प्रशासकीय यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचे चित्र आहे. शहरात पहिल्या टप्प्यातील कामासाठी राज्य शासनाने ११० कोटी मंजूर केले. त्यापैकी ८७ कोटींची निविदा प्रकाशित करण्यात आली होती. जलवाहिनीचे जाळे टाकण्याचा कंत्राट ‘एपी अ‍ॅन्ड जीपी’ कंपनीला देण्यात आला आहे. शहरात ९७ किलोमीटर अंतराचे जाळे टाकताना कंत्राटदाराने मुख्य रस्ते व रस्त्यालगतचा भाग खोदून जलवाहिनी टाकली आहे.  खोदकाम केलेल्या मुख्य रस्त्यांची तीन-तीन महिन्यांपासून दुरुस्ती केली जात नसल्याचे चित्र असून, यासंदर्भात भाजपाचे नगरसेवक सुनील क्षीरसागर यांनी मनपा प्रशासनाला रस्ते दुरुस्तीची मागणी केली आहे. त्यानुषंगाने महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी जलप्रदाय विभाग तसेच ‘एपी अ‍ॅन्ड जीपी’ कंपनीच्या कंत्राटदाराकडून कामकाजाचा आढावा घेतला. रस्त्याचे खोदकाम करून जलवाहिनी टाकल्यानंतर रस्त्याची अवघ्या दहा ते बारा दिवसांत दुरुस्ती करणे तांत्रिकदृष्ट्या अपेक्षित नसले तरी मागील तीन महिन्यांपासून शहरातील मुख्य रस्ते, मुख्य चौकातील दुरुस्तीला का विलंब झाला, असा सवाल उपस्थित करीत मनपा आयुक्त वाघ यांनी रस्ते दुरुस्तीची कामे तातडीने सुरू करण्याचे निर्देश जलप्रदाय विभागासह कंत्राटदाराला दिले आहेत. 

टप्प्याटप्प्याने रस्ते दुरुस्ती करा!महान धरण ते अकोला शहरापर्यंत १४७ किलोमीटर आणि शहरातील अंतर्गत भागात २६५ किलोमीटर अंतराची नवीन जलवाहिनी टाकल्या जाणार आहे. आजरोजी शहरात जलवाहिनीचे सुमारे ९७ किलोमीटरचे जाळे टाकण्यात आले आहे. पुढील टप्प्याला सुरुवात करण्यापूर्वी कंत्राटदाराने आधी खोदकाम के लेल्या रस्त्याची दुरुस्ती करावी, त्यानंतर पुढील कामाला सुरुवात करण्याचे स्पष्ट निर्देश मनपा आयुक्तांनी दिले आहेत.

मजीप्राच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्हहद्दवाढीचा भाग वगळता संपूर्ण शहरात जलवाहिनीचे जाळे टाकल्या जात आहे. प्रभागातील अंतर्गत कामाचा दर्जा योग्यरीत्या नसल्याचे अनेकदा समोर आले आहे. या कामासाठी तांत्रिक सल्लागार म्हणून नियुक्त केलेल्या मजीप्राची क्षमता पाहता त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. असे असले तरी सत्ताधारी भाजपासह चक्क विरोधी पक्ष काँग्रेसने साधलेल्या चुप्पीमुळे अकोलेकर आश्चर्य व्यक्त करीत आहेत. 

टॅग्स :Akolaअकोला