शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या देशी  बीटी कापसाला आली फुले, डॉॅॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे देशातील पहिले संशोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 22:17 IST

अकोला, दि. 22 -  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने बीटी कापूस संशोधन केले असून, विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर यावर्षी चाचणीसाठी पेरणी करण्यात ...

अकोला, दि. 22 -  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने बीटी कापूस संशोधन केले असून, विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर यावर्षी चाचणीसाठी पेरणी करण्यात आली आहे. या बीटीची वाढ जोमदार झाली असून, त्याला फुले, बोंडे धरली आहेत; पण सलग १२ दिवसांपासून कृषी विद्यापीठाच्या सर्वच रोजंदारी मजुरांनी संप पुकारल्याने बीटीवर प्रतिकूल परिणाम होत आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व एका खासगी कंपनीने मिळून हे संशोधन पूर्ण केले आहे. कृषी विद्यापीठांनी निर्मित केलेल्या पीडीकेव्ही-जेकेएल ११६ कपाशीच्या वाणांमध्ये बीजी-२ चे जनुक टाकून नवे वाण विकसित करण्यात आले आहे. याकरिता हैदराबाद येथील बियाणे संशोधन संस्थेसोबत संशोधनाचा सामंजस्य करार करण्यात आला होता. या वाणाला केंद्र शासनाची मान्यता मिळाली असून, या बियाण्याची चाचणी घेण्यात येत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे अकोल्यात मध्यवर्ती संशोधन केंद्र आहे. या केंद्रांतर्गत असलेल्या पश्चिम विभागाच्या प्रक्षेत्रावर चाचणीसाठी या बियाण्याची पेरणी करण्यात आली आहे. या पिकांची वाढ पाऊस नसताना सूक्ष्म सिंचनाच्या पाण्यावर झाली असून, हे झाड अडीच फुटांचे झाले आहे.दरम्यान, समान काम, समान वेतन लागू करू न थकबाकी देण्यात यावी, या मागणीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या सर्वच रोजंदारी मजुरांनी मागील १३ दिवसांपासून कामबंद आंदोलन पुकारल्याने कृषी विद्यापीठाचे हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान होत आहे. बीटी कापसाच्या पिकाला पाण्याची गरज आहे. संप असल्याने बीटीला पाणीसुद्धा मिळाले नाही. दोन दिवसांपूर्वी आलेल्या अल्प पावसावर तरलेल्या या पिकावर आता किडींचा पादुर्भाव होण्याची शक्यता असून, आवश्यक अन्नद्रव्ये मिळत नसल्याने फुले गळताना दिसत आहेत. मध्यवर्ती संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावरील मुगाचे पीकही वाळले आहे; परंतु काढण्यासाठी मजूरच नसल्याने पावसाने हे पीक सडण्याच्या मार्गावर आहे. या संपावर तोडगा न निघाल्याने कृषी विद्यापीठाची इतरही संशोधनाची कामे प्रभावित झाली आहेत.