शहरं
Join us  
Trending Stories
1
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
2
VIDEO: क्लासिक!! धोनीने रांचीच्या रस्त्यावर चालवली व्हिंटेज आलिशान 'रॉल्स-रॉयस'; चाहते खुश
3
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; गोळीबारात आतापर्यंत ९ मृत्यू ८० जखमी
4
हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवणावरचा GST दरात कपात! १ लाखाचे पॅकेज मिळणार ८०,००० हजारात
5
रॉकेट बनला 'हा' शेअर, रणबीर कपूर-दामानींसह अनेक दिग्गजांची खरेदी
6
जीव तुटला...! हजारो नव्या कोऱ्या गाड्यांचा कचरा झाला; पुरात बुडाल्या मारुती, ह्युंदाईच्या कार
7
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी १०० मोबाईल अन् सोन्याच्या चेन केल्या लंपास; चार आरोपींना अटक
8
पूरग्रस्त भागात गेलेल्या काँग्रेस खासदाराला ग्रामस्थांनी खांद्यावर घेतलं, भाजपाने Video वरुन घेरलं
9
समृद्धी महामार्गावर अडीच कोटींची वॅक्सीन चोरी, आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक
10
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
11
सरकारे उलथवून टाकण्यात तरुणाई सर्वात पुढे; आतापर्यंत 'या' देशांमध्ये झाले सत्तापालट
12
पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेली ५ मुलांची आई, लग्न केलं पण...; गावात रंगला हाय वोल्टेज ड्रामा!
13
विमा स्वस्त होणार म्हणून आनंद झाला होता? आता प्रीमियम वाढण्याच्या शक्यतेने वाढली चिंता
14
"क्षमतेपेक्षा जास्त हुंडा दिला तरीही..."; लेकीने लग्नाच्या ९ महिन्यांतच संपवलं जीवन, आईचा टाहो
15
नेपाळमध्ये सोशल मीडिया Appsवर बंदी; Gen-Z आक्रमक, सरकारविरोधात तीव्र निदर्शने
16
एक लाख व्ह्यूज मिळाल्यावर इंस्टाग्राम किती पैसे देते? जाणून व्हाल हैराण!
17
"विरोधकांच्या ठिकऱ्या उडणार, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी..."; भाजपाचा टोला
18
धक्कादायक! जिथे CCTV तिथेच सामान तपासा; रेल्वे प्रवाशांचं साहित्य तपासणारे पोलीसच करतायेत लूट
19
लाल किल्ल्यावरून १ कोटी रुपयांचा कलश चोरणारा पकडला गेला अन् धक्कादायक खुलासा झाला!
20
Asia Cup 2025 : संजू सॅमसन संदर्भात रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य; गंभीरला त्यातील गांभीर्य कळणार का?

आधी ‘जीआयएस’चा सर्व्हे; तरच वेतनासाठी निधी

By admin | Updated: August 4, 2016 01:44 IST

शासनाने स्पष्ट केली भूमिका; मनपाच्या अडचणींत वाढ.

अकोला, दि.३- महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी धोरणात्मक निर्णयावर अंमलबजावणी न करता केवळ आश्‍वासने दिली जातात. त्यामुळे थकीत वेतनाची समस्या वारंवार निर्माण होत आहे. जीआयएसद्वारे मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन केल्यास पालिकेच्या उत्पन्नात वाढ होण्यासोबतच थकीत वेतनाचा प्रश्न निकाली निघेल. प्रशासन जोपर्यंत ह्यजीआयएसह्णच्या सर्व्हेला सुरुवात करीत नाही, तोपर्यंत वेतनासाठी निधी मिळणार नसल्याची भूमिका बुधवारी नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी स्पष्ट केली.स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत वैयक्तिक शौचालय उभारणी व स्वच्छ शहर या मुद्यावर नगर विकास विभागाने महापालिका आयुक्त अजय लहाने यांच्याकडून कामाचा आढावा घेतला. यावेळी कर्मचार्‍यांच्या थकीत वेतनाच्या विषयावर शासनाने भूमिका मांडली. केंद्र व राज्य शासनाने विविध योजनांसाठी महापालिकेला निधी उपलब्ध करून दिला. मनपा प्रशासनाने कोट्यवधींची रक्कम ठेवींच्या स्वरूपात बँकेत जमा केली. त्याबदल्यात जमा झालेल्या व्याजाची रक्कम कर्मचार्‍यांच्या थकीत वेतनासाठी देण्याची मागणी करीत स्थानिक लोकप्रतिनिधींनी शासनाकडे रेटा धरला. त्या पृष्ठभूमिवर नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी रोखठोक मत व्यक्त केले. २0११ मध्ये सहा महिन्यांच्या थकीत वेतनासाठी शासनाने कर्ज स्वरूपात १६ कोटींची मनपाला आर्थिक मदत केली होती. त्यावेळीसुद्धा उत्पन्नात वाढ करण्याचे आश्‍वासन पालिका प्रशासनाने दिले होते. या पाच वर्षांच्या कालावधीत पालिकेने उत्पन्न वाढीसाठी कोणतेही ठोस प्रयत्न केले नसल्याचे प्रधान सचिव म्हैसकर यांनी सांगितले. त्यामुळे आधी ह्यजीआयएसह्णलागू करा, त्यानंतरच वेतनासाठी निधीचे नियोजन केले जाणार असल्याचे प्रधान सचिवांनी स्पष्ट केले. लोकप्रतिनिधींच्या भूमिकेकडे लक्षकर्मचार्‍यांच्या थकीत वेतनासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी शासनाकडे सतत पाठपुरावा करीत आहेत. मनपा प्रशासनाने मालमत्ता पुनर्मुल्यांकनासाठी ह्यजीआयएसह्ण च्या कंत्राटदाराला कार्यादेश दिले; मात्र वर्तमान स्थितीत सत्ताधारी भाजप व मनपा आयुक्त अजय लहाने यांच्यातील ताणलेल्या संबंधाचा परिणाम ह्यजीआयएसह्णच्या कामावर होत असल्याची बाब कोणीही नाकारत नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी निधीची मागणी करण्यापेक्षा सत्तापक्ष व प्रशासनाचे कान उपटत उत्पन्नवाढीच्या मुद्यावर खडेबोल सुनावण्याची गरज निर्माण झाली आहे. "जीआयएसद्वारे सर्व्हे सुरू करण्यासाठी शासन आग्रही आहे. सर्व्हे सुरू करून त्याचा अहवाल पाठवण्याचे प्रधान सचिवांनी निर्देश दिले आहेत. सर्वपक्षीय नगरसेवकांच्या सहकार्याची अपेक्षा आहे."- अजय लहाने, आयुक्त, मनपा